S M L

प्रदूषणामुळे श्रीलंकेचे खेळाडू पुन्हा मास्क घालून मैदानात

श्रीलंकेची पहिली इंनिंग ३७३ धावांवर संपली. त्यानंतर फिल्डींगसाठी लंकेची टीम मैदानात उतरताना पुन्हा मास्क घालून उतरले. दिल्ली कसोटीचा दुसरा दिवस क्रिकेटपेक्षा प्रदूषणामुळे गाजला होता

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 5, 2017 12:31 PM IST

प्रदूषणामुळे श्रीलंकेचे खेळाडू पुन्हा मास्क घालून मैदानात

दिल्ली, 05 डिसेंबर:  दिल्ली कसोटीच्या चौथ्या दिवशीही श्रीलंकेचे खेळाडू मास्क घालून मैदानात उतरले आहेत. याआधी  दुसऱ्या दिवशी ते खेळाडू मास्क घालून उतरले होते.

श्रीलंकेची पहिली इंनिंग ३७३ धावांवर संपली. त्यानंतर फिल्डींगसाठी लंकेची टीम मैदानात उतरताना पुन्हा मास्क घालून उतरले. दिल्ली कसोटीचा दुसरा दिवस क्रिकेटपेक्षा प्रदूषणामुळे गाजला होता. त्यादिवशी श्रीलंकेचे खेळाडू मास्क घालून मैदानावर उतरले तर होतेच पण प्रदूषणाच्या त्रासापायी एकएक करत मैदान सोडूनही गेले होते.  पण त्याशिवाय  आज फिल्डिंगला येताना पुन्हा लंकेच्या खेळाडूंनी मास्क लावल्यामुळे पुन्हा दिल्ली प्रदूषणाच्या चर्चेनं जोर धरलाय.

जर हा सामना प्रदूषणामुळे रद्द झाला तर भारताची  मोठी नामुष्की होईल. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 5, 2017 12:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close