सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या महान खेळाडूच्या मृत्यूची बातमी, पण 'हे' आहे सत्य

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या महान खेळाडूच्या मृत्यूची बातमी, पण 'हे' आहे सत्य

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार जयसूर्याचे टोरंटो येथे एका अपघातात मृत्यू झाला असल्याची बातमी व्हायरल झाली होती.

  • Share this:

कोलंबो, 27 मे : श्रीलंकेचा प्रमुख फलंदाज आणि 1996च्या विश्वचषकात श्रीलंकेला चॅम्पियन बनवणाऱ्या आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्याचे अपघात निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार जयसूर्याचे टोरंटो येथे एका अपघातात मृत्यू झाला असल्याची बातमी व्हायरल झाली होती. यावर भारताचा फिरकीपटू आर. अश्विन यानंही आश्चर्य व्यक्त करत, खरच असं झाले आहे की असा सवाल विचारला.

श्रीलंकेचा धडाकेबाज सलामी फलंदाज सनथ जयसूर्या यांच्या फलंदाजीसमोर भलेभले गोलंदाज घाबरात असतं. त्यामुळं अश्या खेळाडूच्या मृत्यूची बातमी सगळीकडे पसरली. यावर अश्विनही ट्विट करत, ''जयसूर्या यांच्याबद्दल व्हायरल होत असलेली बातमी खरी आहे का. मला व्हॉटसअॅपवरुन अशी बातमी मिळाली, मात्र ट्विटरवर अशी बातमी मिळाली नाही'', यावर चाहत्यांनी अश्विनला ही बातमी खोटी असल्याची माहिती दिली.

स्वत:च्या मृत्यूवर जयसूर्यानेच दिलं स्पष्टिकरण

जयसूर्याच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर यावर खुद्द जयसूर्यानं, ही बातमी खोटी असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. जयसूर्यानं ट्विट करत, "मी एकदम ठीक आहे. आणि मुळात मी कॅनडामध्ये नाही तर श्रीलंकेतच आहे. कृपा करा आणि चुकीच्या बातम्या पसरवू नका", स्पष्ट केले.

जयसूर्यावर आहे सध्या बॅन

आयसीसीनं श्रीलंकेचा महान फलंदाज सनथ जयसूर्याला 'मॅच फिक्सिंग' मध्ये दोषी आढळल्यामुळं बॅन केले आहे. श्रीलंकेतील एका वेबसाईटने हा दावा केला असून यात जयसूर्यासह श्रीलंकेच्या सात खेळाडूंचा समावेश असल्याचे वृत्त त्यांनी प्रसिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या लाचलुचपत विभागाचे सरचिटणीस अॅलेक्स मार्शल यांचा सामवेश असलेल्या समितीने या प्रकरणाचा छडा लावला आहे.

वाचा-World Cup : रोहितला शहाणपणा शिकवण्याआधी हे वाचा...

वाचा-भेलपुरीवाल्याकडून आईला समजला मुलाचा सहा षटकारांचा पराक्रम

वाचा-वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा लागू होणार ICCचे 7 नियम

उमेदवारी मागे घेण्यासाठी राजू शेट्टींचा प्रकाश आंबेडकरांना 24 वेळा फोन?, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: May 27, 2019, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading