नवी दिल्ली, 18 जून : 2011 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकावर श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी मोठा आरोप केला आहे. हा विश्वचषकातील अंतिम सामना हा फिस्क असल्याचं खळबळजनक वक्यव्य त्यांनी केलं आहे. ते श्रीलंकेतील News 1st वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने विजेतेपद जिंकलं होतं. 28 वर्षांनंतर विश्वचषक जिंकल्यामुळे सर्वांसाठी हा विजय खूप महत्त्वाचा होता.
2011 साली महिंदानंद अलुथगमगे श्रीलंकेचे क्रीडामंत्री होते. आपल्या वक्तव्याची पूर्ण जबाबदारी आपण घेत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर आपल्या देशाच्या सन्मानाची चिंता असल्यानं त्यांना याबद्दल अधिक खुलासा करण्याची इच्छा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. न्यूज फर्स्टला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, '2011मधील वर्ल्ड कप फायनल मी क्रीडामंत्री असतानाच फिक्स केला होता. माझ्या या विधानावर मी ठाम आहे. या वक्तव्याची मी पूर्ण जबाबदारी घेतो. मी यामध्ये कोणाचंही नाव घेणार नाही. आम्ही हा सामना जिंकलो असतो पण तो आधीच फिक्स गेला गेला होत.'
मुंबईत झालेल्या या अंतिम सामन्यात कर्णधार कुमार संगकारानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. महेला जयवर्धने नाबाद 103 आणि संगकाराने 48 चेंडूंत 67 धावा केल्या होत्या. तर श्रीलंकेची धावसंख्या 50 षटकांत 6 विकेट्ससाठी 274 अशी होती. भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान आणि युवराज सिंगने प्रत्येकी दोन गडी बाद केले होते आणि 275 धावांचा पाठलाग करताना वीरेंद्र सेहवाग (0) आणि सचिन तेंडुलकर (18) वर बाद झाला.
यानंतर 122 चेंडूत गौतम गंभीरने 97 धावांची शानदार खेळी केली. त्याने विराट कोहलीबरोबर 83 धावांची भागीदारी केली. यावेळई धोनीने युवराजसिंगच्या आधी खेळण्याचं ठरवलं होतं. धोनी 91 आणि गंभीरने चौथ्या विकेटसाठी १० धावांची भागीदारी केली होती. यावेळी भारताला विजयासाठी 11 चेंडूत 4 धावांची गरज होती. त्यानंतर धोनीने षटकार खेचत विश्वचषकावर भारताचं नाव लिहिलं होतं.
संपादन - रेणुका धायबर