किदंबी श्रीकांत जिंकला इन्डोनेशिया ओपन

किदंबी श्रीकांत जिंकला इन्डोनेशिया ओपन

भारताच्या बॅडमिन्टनपटू किदंबी श्रीकांतने काल इन्डोनेशिया ओपनचा किताब जिंकला. ही त्याने जिंकलेली सलग तिसरी बॅडमिन्टनची मालिका होती.

  • Share this:

19 जून : भारताच्या बॅडमिन्टनपटू किदंबी श्रीकांतने काल इन्डोनेशिया ओपनचा किताब जिंकला. ही त्याने जिंकलेली सलग तिसरी बॅडमिन्टनची मालिका होती.

जगात 22व्या क्रमांकावर  असणारा किदंबी श्रीकांतचे गुरू पुल्लेलाल गोपीचंद आहेत. या आधी तो सिंगापूर  ओपनच्या फायनलमध्ये पोचला होता. श्रीकांतनं जपानच्या काझुमाका सकाईला  21-11,21-19 असे दोन गेम्समध्ये सरळ हरवलं. सगळी मॅच त्यानं एकहाती फक्त  37 मिनटात जिंकली.

दुसरा गेम हा अत्यंत रोमांचक आणि लक्षवेधी ठरला. या मॅचमध्ये स्कोअर 19-19 इतका झाला होता.पण श्रीकांतनं मुसंडी मारत खेळ फिरवला आणि दोन स्मॅशेसमध्ये विजय नोंदवला.

या विजयाचं श्रेय त्यानं आपल्या गुरूंना दिलंय.

First published: June 19, 2017, 1:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading