S M L

.....तर श्रीकांत शेती करत असता

श्रीकांत गुंटूरच्या एका मध्यमवर्गीय शेतकरी कुंटुबात जन्माला आला होता. त्याचे वडील कृष्णा हे जिल्हास्तरापर्यंत क्रिकेट खेळले होते.

Sonali Deshpande | Updated On: Jun 28, 2017 05:15 PM IST

.....तर श्रीकांत शेती करत असता

28 जून : इंडोनेशियन ओपन आणि आॅस्ट्रेलियन ओपनसारख्या नावाजलेल्या स्पर्धा जिंकणारा श्रीकांत जर बॅडमिंटनपटू नसता तर आज एखाद्यावेळा त्याच्या भावासोबत शेती करत असता. श्रीकांत आणि त्याचा भाऊ नंदगोपाल दोघंही आज जागतिक कीर्तीचे बॅडमिंटनपटू आहेत.

श्रीकांत गुंटूरच्या एका मध्यमवर्गीय शेतकरी कुंटुबात जन्माला आला होता. त्याचे वडील कृष्णा हे जिल्हास्तरापर्यंत क्रिकेट खेळले होते. पण आपल्या मुलांना मात्र त्यांनी बॅडमिंटनपटू केलंय.

नंदगोपाल आणि श्रीकांत दोघांचीही आंध्र प्रदेश स्पोर्टस अकादमीत निवड झाली होती. दोघांना ही खेळाडू बनवण्यासाठी त्यांच्या वडिलांनी जमीन लिजवर दिली होती. अर्थात त्यांनी खेळलेला हा एक जुगार होता. 'मी आपल्या मुलांना एकच गोष्ट सांगितली होती -जर क्रीडा क्षेत्र निवडणार असाल तर त्याबाबत सीरीयस व्हा जर अभ्यास निवडत असाल तर त्याबाबतीत सीरीयस व्हा,पण एकाच वेळी दोन्ही दगडांवर पाय ठेवू नका.' असं त्या दोघांच्या आईनं सांगितलं .आपल्या दोन्ही मुलांना खेळात पुढे जाऊ देण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या आई-वडिलांनी घेतला होता.त्यानंतर श्रीकांतमधला स्पार्क गोपीचंदनं हेरला. आधी श्रीकांत फक्त डबल्स खेळायचा. त्याला सिंग्लस खेळायची इच्छा नव्हती. पण गोपीचंदने त्याला सिंगल्स खेळायला भाग पाडलं. आज श्रीकांतकडे वर्ल्ड चॅम्पियन मटेरियल म्हणून पाहिलं जात आहे. त्याच्याकडे आज अनेक आॅफर्स आहेत. लवकरच तो खेळातून ब्रेक घेऊन घरी परत येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 05:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close