Home /News /sport /

अंपायरिंग सोडून Live Match मध्ये फिल्डिंग, कुमार धर्मसेनाला नेमकं काय झालं? Video Viral

अंपायरिंग सोडून Live Match मध्ये फिल्डिंग, कुमार धर्मसेनाला नेमकं काय झालं? Video Viral

श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या वनडेमध्ये (Sri Lanka vs Australia) 6 विकेटने पराभव केला. या सामन्यात अंपायर कुमार धर्मसेना (Kumar Dharmasena) यांनी चक्क फिल्डिंग केली. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही हे पाहून धक्का बसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 20 जून : श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या वनडेमध्ये (Sri Lanka vs Australia) 6 विकेटने पराभव केला. या विजयासोबतच लंकेने 5 मॅचच्या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी केली आहे. कोलंबोमध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिले बॅटिंग करत 6 विकेट गमावून 291 रन केले. या आव्हानाचा पाठलाग श्रीलंकेने 9 बॉल शिल्लक असताना 6 विकेट गमावून केला. या सामन्यात अंपायर कुमार धर्मसेना (Kumar Dharmasena) यांनी चक्क फिल्डिंग केली. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही हे पाहून धक्का बसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाची इनिंग सुरू असताना विकेट कीपर एलेक्स कॅरी (Alex Carrey) बॅटिंग करत होता. तेव्हा त्याने स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉट मारला. तिकडे अंपायर कुमार धर्मसेना उभे होते. 90 च्या दशकात श्रीलंकेकडून खेळलेल्या कुमार धर्मसेनाने बॉल पकडण्यासाठी हात पुढे केला, पण काही सेकंदांमध्येच त्यांना आपण या मॅचमध्ये फिल्डर नसून अंपायर असल्याचं लक्षात आलं, त्यामुळे त्यांनी हात मागे घेतला. यानंतर धर्मसेना यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. हेड-फिंचची अर्धशतकं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने (Aron Finch) या सामन्यात 62 रनची तर ट्रेविस हेडने (Travis Head) 65 बॉलमध्ये नाबाद 70 रनची खेळी केली. एलेक्स कॅरीने 52 बॉलमध्ये 49 रन केले, तर ग्लेन मॅक्सवेलने 18 बॉलमध्ये 33 रनची आक्रमक खेळी केली. मार्नस लाबुशेन 29 रनवर आऊट झाला. श्रीलंकेकडून जेफ्री वांडरसेने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. पथुम निसांकाचं शतक श्रीलंकेकडून ओपनर पथुम निसांकाने (Pathum Nisanka) 133 रनची खेळी केली. 147 बॉलमध्ये त्याने 11 फोर आणि 2 सिक्सही मारल्या. कुसल मेंडिसने 85 बॉलमध्ये 87 रन केले. ऑस्ट्रेलियाकडून झाय रिचर्डसनने 2 विकेट घेतल्या. सीरिजची चौथी वनडे 21 जूनला होणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या