कोलंबो, 22 नोव्हेंबर : श्रीलंकेचा ऑलराऊंडर धनंजया डिसिल्वाने (Dhananjaya de Silva) वेस्ट इंडिजविरुद्धच्या (Sri Lanka vs West Indies 1st Test) पहिल्या टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी संयमी अर्धशतक केलं. पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या डिसिल्वाने 95 बॉलमध्ये 61 रन केले. डिसिल्वा शतक करेल असं वाटत असतानाच तो अत्यंत निराशाजनक पद्धतीने आऊट झाला. डिसिल्वाच्या या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 95 व्या ओव्हरमध्ये शेनॉन गॅब्रेलच्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. गॅब्रेलने टाकलेल्या बॉलला डिसिल्वाने बॅट लावली, यानंतर बॉल स्टम्पच्या दिशेने जात होता, तेव्हा त्याने बॉलला स्टम्पपासून लांब केलं, पण या नादात त्याची बॅट स्टम्पला लागली. अशाप्रकारे आऊट झाल्याचं पाहून डिसिल्वालाही धक्का बसला.
In the Sri Lanka v West Indies Test match, Dhananjaya de Silva was dismissed hit wicket. The Cricinfo description is one thing. The vision is even better. #SLvWI pic.twitter.com/PIFmBV3UUH
— Andrew Donnison (@Donno79) November 22, 2021
डिसिल्वाच्या अर्धशतकाआधी दिमुथ करुणारत्ने आणि पथुम निसांका यांनी 139 रनची ओपनिंग पार्टनरशीप केली. कर्णधार करुणारत्नेने 300 बॉलमध्ये 147 रन केले, तर निसांका 140 बॉलमध्ये 56 रन करून माघारी परतला. श्रीलंकेने पहिल्या इनिंगमध्ये 386 रन केले. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. वारिकनला 3 आणि गॅब्रेलला 2 विकेट घेण्यात यश आलं.
श्रीलंकेची इनिंग संपल्यानंतर बॅटिंगला आलेल्या वेस्ट इंडिजचा स्कोअर दुसऱ्या दिवसाअखेर 113/6 एवढा झाला आहे. काईल मेयर्स 22 रनवर आणि जेसन होल्डर 1 रनवर खेळत आहेत. ओपनर क्रेग ब्रॅथवेटने 41 रन केले. श्रीलंकेकडून रमेश मेंडिसने 3, प्रवीण जयविक्रमाने 2 आणि लसिथ एम्बुलडेनियाने 1 विकेट घेतली.
IND vs NZ: हर्षल पटेलच्या नावावर दुसऱ्याच मॅचमध्ये झाला नकोसा रेकॉर्ड, VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.