क्रिकेटच्या मैदानावर मोठी घटना, झेल घेताना चेंडू लागल्यानं खेळाडू मैदानावरच बेशुद्ध

क्रिकेटच्या मैदानावर मोठी घटना, झेल घेताना चेंडू लागल्यानं खेळाडू मैदानावरच बेशुद्ध

महिला टी20 वर्ल्ड कपच्या आधी सुरु असलेल्या सरावामध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यावेळी लंकेची क्रिकेटपटू अचिनि कुलासूर्या हिला दुखापत झाली.

  • Share this:

अॅडलेड, 16 फेब्रुवारी : क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा लहानमोठ्या दुखापती होत असतात. कधी कधी चेंडू लागून किंवा इतर कारणांनी खेळाडू जखमी तसेच बेशुद्धही होतात. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला टी20 वर्ल्ड कपच्या सराव सामन्यावेळी अशीच एक दुर्घटना घडली आहे. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यावेळी लंकेची क्रिकेटपटू अचिनि कुलासूर्या हिला दुखापत झाली. त्यामुळे मैदानावरच ती बेशुद्ध पडली. कुलासूर्या झेल पकडत असताना ही घटना घडली.

झेल घेत असताना चेंडू थेट डोक्यावर आदळला. त्यानंतर कुलासूर्या मैदानावरच पडली. कुलासूर्या मैदानावर पडल्याचे पाहताच फीजिओ मैदानावर आले. ती कोणतीच हालचाल करत नसल्यानं सर्वांनाच धक्का बसला. इतर सहकाऱ्यांनी धाव घेतली आणि तिला स्ट्रेचरवरून थेट रुग्णालयात नेलं.

रुग्णालयात सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कुलासूर्यावर उपचार केले जात आहेत. ती शुद्धीवर आली असून तिला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल. श्रीलंकेच्या संघाच्या पदाधिकाऱ्यांनीही याची माहिती दिली आहे.

श्रीलंकेच्या संघाला दक्षिण आफ्रिकेने 41 धावांनी पराभूत केलं. मात्र सामन्यानंतर सरावासाठी सुपर ओव्हरही खेळवण्यात आली. यातील पहिल्याच चेंडूवर आफ्रिकेची फलंदाज ट्रायनने उंच फटका मारला. त्यावेळी कुलासूर्या झेल घेण्यासाठी धावली. झेल घेताना चेंडू सुटल्यानं डोक्यावर आदळला.

वाचा : इशांत शर्माची टीम इंडियात एन्ट्री, युवा खेळाडूचं पदार्पण लांबणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Feb 16, 2020 06:13 PM IST

ताज्या बातम्या