श्रीलंकेचा संघ पाकमध्ये खेळून पुन्हा स्वत:चा जीव टाकणार धोक्यात?

श्रीलंकेचा संघ पाकमध्ये खेळून पुन्हा स्वत:चा जीव टाकणार धोक्यात?

2009मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व संघांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास मनाई केली होती.

  • Share this:

कोलंबो, 18 ऑगस्ट : सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची हालत पाहता, देशातील दहशतवाद त्यांच्यासाठी घातक ठरणार आहे. 2009नंतर कोणत्याही संघानं पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यात होकार दिलेला नाही. 2009मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात श्रीलंकेचा संघ थोडक्यात बचावला होता, दोन खेळाडू जखमीही झाले होते. मात्र आता पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळं तब्बल 10 वर्षांनी पाकचा संघ घरच्या मैदानावर कसोटी सामना खेळणार आहे.

पीसीबीनं श्रीलंकेच्या संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्याआधी संघ सुरक्षा व्यवस्थापन पथकाला पाठवण्याची विनंती केली होती. त्यानुसार श्रीलंका क्रिकेट बोर्डानं यासंबंधी आपला रिपोर्ट सादर केला आहे. त्यामुळं 2009नंतर पुन्हा श्रीलंकेचा संघ पाकिस्तानात क्रिकेट खेळू शकतो. क्रिकइन्फोनं दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा समितीच्या सकारात्मक अहवालानंतर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात एक कसोटी सामना होणार आहे.

दरम्यान दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच श्रीलंकेचा संघ पाकमध्ये जात आहे, असे नाही. याआधी 2018मध्ये श्रीलंकेचा संघ टी-20 सामना खेळण्यासाठी पाकमध्ये गेली होती. तसेच, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे संघांनीही पाकिस्तान दौरा केला आहे. याआधी सुरक्षेच्या मुद्द्यावरून संघांनी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता.

पाकिस्तानच्या एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार श्रीलंका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. यात 2 कसोटी सामने खेळले जाणार आहे. दरम्यान आता पीसीबी इतर संघांनाही पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आवाहन करणार आहे.

वाचा-अखेर रवी शास्त्रींनी सोडवला चौथ्या क्रमांकाचा तिढा, 'या' खेळाडूचं नाव फिक्स!

शुक्रवारी समितीनं आपला अहवाल केला सादर

एसएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डी सिल्वा यांनी, "सुरक्षा टीमनं आम्हाला दिलेला अहवाल सकारात्मक असून, अंतिम निर्णयावर येण्याआधी आम्ही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी याबाबत चर्चा करणार आहोत. यात सरकारशीही चर्चा केली जाणार आहे", असे सांगितले.

वाचा-रनमशीनची नाबाद 11 वर्ष! केवळ 12 धावा करत केली टीम इंडियात एण्ट्री

SPECIAL REPORT: समुद्र किनारी रेतीतच रंगला 'कुस्तीचा फड', नारळी पौर्णिमेची अलिबागमध्ये धूम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 04:33 PM IST

ताज्या बातम्या