SL vs NZ : न्यूझीलंडच्या गोलंदाजाची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी, फक्त 66 सामन्यात केली अजब कामगिरी!

SL vs NZ : न्यूझीलंडच्या गोलंदाजाची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी, फक्त 66 सामन्यात केली अजब कामगिरी!

sri lanka vs new Zealand : सचिन तेंडुलकरनं 200 कसोटी सामन्यात केलेली कामगिरी न्यूझीलंडच्या या गोलंजानं केवळ 66 सामन्यात केली.

  • Share this:

गाले, 16 ऑगस्ट : महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मोठ्या तेजीनं सचिनच्या विक्रमांच्या जवळ येत आहे. मात्र आता सचिनच्या एक रेकॉर्डशी कोणच्या फलंदाजानं नाही तर गोलंदाजानं बरोबरी केली आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदीनं श्रीलंकेविरोधात होत असलेल्या कसोटी सामन्यात सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली.

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात टीम साऊदीनं पहिल्या डावात 26 चेंडूत 14 धावा केल्या. या डावात साऊदीनं एक षटकारही मारला. या एका षटकारासह साऊदीनं कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी केलीय. सचिननं कसोटी क्रिकेटमध्ये 69 षटकार मारले आहे, आता साऊदीच्या नावावरही 69 षटकार आहेत.

सचिननं 200 कसोटी सामन्यात 329 डावांत फलंदाजी करत 69 षटकार मारले. तर, टीम साऊदीनं 66 सामन्यात केवळ 96 डावांमध्ये ही कामगिरी केली. साऊदी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 17व्या क्रमांकावर आहे. साऊदीनं दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स, श्रीलंकेता सनथ जयसुर्या, सौरव गांगुली आणि इयॉन बॉथम या सर्व दिग्गजांना मागे टाकले आहे.

वाचा-निवृत्तीनंतर क्रिकेट मैदानावर उतरणार अंबाती रायडू, 'या' संघाकडून करणार पदार्पण

सर्वात जास्त षटकारांमध्ये सेहवाग आघाडीवर

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार मारण्याचा न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रॅण्डम मॅक्युलम याच्या नावावर आहे. मॅक्युलमनं 107 षटकार मारले आहेत. तर, विरेंद्र सेहवागच्या नावावर 91 तर धोनीच्या नावावर 78 षटकार आहेत.

वाचा-युवराज सिंगला प्रशासकीय समितीनं दिला मोठा धक्का, हातात बॅटही घेऊ शकणार नाही?

साऊदीनं घेतल्या 244 विकेट

टीम साऊदीनं 66 सामन्यात 1550 धावा केल्या आहेत. त्यानं सर्वाधिक 78 धावा केल्या आहेत. तर, 244 विकेट घेतल्या आहेत.दरम्यान जर साऊदीनं आणखी एक षटकार लगावला तर, यूनिस खान आणि क्लाईव लॉयड यांच्या विक्रमाशी बरोबरी करेल.

वाचा-धोनीला चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार करणाऱ्या भारतीय क्रिकेटरने संपवले जीवन!

पुरामध्ये काढत होता सेल्फी, पाणी वाढले अन्...पाहा हा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 05:28 PM IST

ताज्या बातम्या