BAN vs SL : Live सामन्यात बेशुद्ध पडले बाबा, मुलाच्या तुफानी खेळीनं संघ विजयी

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं 7 विकेटनं बांगलादेशला नमवत, 44 वर्षांनी घरच्या मैदानावर मालिका विजय मिळवला.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 02:30 PM IST

BAN vs SL : Live सामन्यात बेशुद्ध पडले बाबा, मुलाच्या तुफानी खेळीनं संघ विजयी

कोलंबो, 29 जुलै : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय सामन्यात सलामी फलंदाज अविष्का फर्नांडोनं मोलाचे योगदान दिले. त्याच्या तुफानी खेळीच्या जोरावर श्रीलंकेनं 7 विकेटनं हा सामना जिंकला आणि 44 वर्षांनी घरच्या मैदानावर मालिका विजय मिळवला. या सामन्यात अविष्कानं 82 धावांची खेळी केली त्यामुळं त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

मात्र, सामना सुरू असतानाच अविष्का फर्नांडच्या बाबांसोबत धक्कादायक प्रकार घडला. मुलीची खेळी पाहण्यासाठी आलेल्या फर्नांडो यांना लाईव्ह सामन्यातच भुरळ आली. त्यांना लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मैदानात खेळत असलेल्या अविष्काला ही बाब माहिती नव्हती.

वडिलांची तब्येत खराब तरी खेळला अविष्का

अविष्काच्या बाबांना जेव्हा चक्कर आली, तेव्हा तो फलंदाजी करत होता. श्रीलंकेच्या संघानं आणि स्टाफनं त्यांना याबाबत माहिती दिली नाही. दरम्यान 82 धावांनी तुफानी खेळी करून जेव्हा अविष्का बाद झाला तेव्हा त्यांना बाबांच्या तब्येतीबाबत माहिती मिळाली. दरम्यान सामन्यानंतर अविष्कानं, "मी खेळत होतो तेव्हा मला याबाबत काहीच माहिती नव्हती. आता बाबांची तब्येत ठीक आहे. माझ्या शतकापेक्षा संघाचा विजय महत्त्वाचा", असेही अविष्का म्हणाला.

वाचा-टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज होणार रवाना, संघातील वाद मात्र चव्हाट्यावर

Loading...

असा झाला श्रीलंकेचा विजय

श्रीलंकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सात विकेटनं बांगलादेशला पराभूत करत दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0नं विजय मिळवला. श्रीलंका संघानं तब्बल 44 वर्षांनी घरच्या मैदानावर विजय मिळवला. 2015मध्ये वेस्ट इंडिज विरोधात श्रीलंका शेवटची मालिका जिंकली होती. या सामन्यात बांगलादेशनं टॉस जिंकत फलंदाजीची निर्णय घेतला. यात त्यांनी 238-8 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना, अविष्का 82 धावा केल्या.

वाचा-रोहित-विराट वादाला नवं वळण, कोहली पत्रकार परिषद घेणार पण...

वाचा-भारताला मिळाला मलिंगा! एकच डोळा असून टाकतो बुमराहसारखा यॉर्कर

VIDEO: गंगापूर धरण 80 टक्के भरलं; सोमेश्वर धबधबा खळखळला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 02:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...