आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या ‘मिस्ट्री’ गोलंदाजानं घेतली निवृत्ती!

मिस्ट्री गोलंदाज या नावाने प्रसिध्द असलेल्या गोलंदाजानं जाहीर केली निवृत्ती.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 07:08 PM IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या ‘मिस्ट्री’ गोलंदाजानं घेतली निवृत्ती!

कोलंबो, 28 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वर्ल्ड कपनंतर अनेक खेळाडूंनी निवृत्ती घेतली. याआधी श्रीलंकेचा यॉर्कर किंग लसिथ मलिंगा यानं निवृत्ती जाहीर केली होती. आता श्रीलंकेच्या आणखी एक गोलंदाजानं निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिस्ट्री गोलंदाज या नावाने ओळखले जाते. या खेळाडूचे नाव आहे अजंथा मेंडिस.

मेंडिस सध्या 34 वर्षांचा असून तब्बल 4 वर्ष त्याला आंतरराष्ट्रीय सामने खेळता आलेला नाही. मेंडिस 2015मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, त्यानंतर त्याला संघात स्थान मिळवता आले नाही. त्यामुळं 2015नंतर मेंडिस प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत होता. दरम्यान काही मीडिया रिपोर्टनुसार संघात जागा मिळत नसल्यामुळं मेंडिसनं निवृत्ती घेतली असल्याचे म्हटले आहे.

श्रीलंका संघासाठी मेंडियनं 19 कसोटी सामना, 87 एकदिवसीय सामने आणि 39 टी-20 सामने खेळले आहेत. मेंडिसनं आपल्या सात वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 70 विकेट घेतल्या आहे. तर, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 218 विकेट घेतल्या आहेत. आपल्या पदार्पणातच मेंडिसनं फलंदाजांची झोप उडवली होती. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणातच मेंडिसनं 8 विकेट घेतल्या होत्या. तर, पहिल्या एकदिवसीय सामन्यात 3 तर, टी-20 सामन्यात 4 विकेट घेतल्या होत्या.

वाचा-फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या यॉर्कर किंगनं क्रिकेटसाठी सोडले होते घर!

मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळख

मेंडिसची ओळख मिस्ट्री फिरकीपटू म्हणून होती. कॅरम बॉलचा खरा शोध लावणारा गोलंदाज म्हणूनही त्याला ओळखले जाते. मेंडिस हा एकमेव गोलंदाज आहे, ज्यानं टी-20 सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत.

वाचा-Sorry मानसी! एका पायावर गोल्ड मिळवूनही आम्ही तुझी दखल घेण्यास कमी पडलो

बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2019 07:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...