लंडन, 30 जून : श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बायो-बबल तोडणाऱ्या 3 खेळाडूंचं निलंबन केलं आहे. कुसल मेंडिस (Kusal Mendis), निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) आणि धनुष्का गुणतिलका (Danushka Gunathilaka) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मेंडिस, डिकवेला आणि गुणतिलका पुढचं एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाहीत. इंग्लंड दौऱ्यावर असलेले हे खेळाडू तिसऱ्या टी-20 नंतर डरहममधल्या हॉटेलमधून बाहेर गेले. हॉटेल बाहेरच्या रस्त्यावर खेळाडू सिगरेट पिताना आढळले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या तिन्ही खेळाडूंवर कडक कारवाई केली आणि तिघांना मायदेशी परत बोलावलं. आता या खेळाडूंचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. निलंबनाशिवाय खेळाडूंना मोठा दंडही लावण्यात आला आहे, पण दंडाची रक्कम किती आहे, याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही.
Familiar faces in Durham tonight, enjoying their tour! Obviously not here to play cricket, this video was taken at 23.28 Sunday. Disappointing performance by these cricket players but not forgetting to enjoy their night at Durham. RIP #SrilankaCricket #KusalMendis #ENGvSL pic.twitter.com/eR15CWHMQx
— Nazeer Nisthar (@NazeerNisthar) June 28, 2021
कुशल मेंडिस, निरोशन डिकवेला आणि धनुष्का गुणतिलका हे तिन्ही खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये अपयशी ठरले. मेंडिसने 3 मॅचमध्ये 54 रन, डिकवेलाने 2 सामन्यांमध्ये 14 रन आणि गुणतिलकाने 3 मॅचमध्ये 26 रन केले.
मेंडिस, गुणतिलका आणि डिकवेला यांच्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे आता ते भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजमध्येही खेळू शकणार नाहीत. 13 जुलैपासून भारत-श्रीलंका यांच्यात 3 वनडे मॅचची सीरिज सुरु होणार आहे. या सीरिजनंतर 3 टी-20 मॅच खेळवल्या जातील. हे तिन्ही खेळाडू सध्या क्वारंटाईन आहेत. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तिघांची चौकशी सुरु होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket