पाकमध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी, तरीही श्रीलंकेची खेळण्याची हौस!

पाकमध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी, तरीही श्रीलंकेची खेळण्याची हौस!

दहा वर्षांपूर्वी लंकेच्या संघावर पाकमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतरही धमकी दिली असतानाही लंकेचे खेळाडू पाकिस्तान दौऱ्यासाठी रवाना झाले.

  • Share this:

कोलंबो, 24 सप्टेंबर : दहशतवादी हल्ल्याची धमकी आणि सुरक्षेची भीती असतानाही धोका पत्करून लंकेचा संघ मंगळवारी सकाळी पाकिस्तान दौऱ्यासाठी रवाना झाला. संघाच्या दहा खेळाडूंनी या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. तरीही लंकेच्या क्रिकेट बोर्डानं सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास दाखवत संघ पाकिस्तानला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी लंकेच्या टी20 संघाचा कर्णधार दासुन शनाका ने म्हटलं की, मी याआधीही पाकिस्तानला गेलो आहे. मी सुरक्षा व्यवस्थेबद्दल समाधानी आहे. मला याचा आनंदही आहे की मी पाकिस्तान दौऱ्यावर लंकेचं नेतृत्व करत आहे. मला आशा आहे की पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर आम्ही कडवं आव्हान देऊ.

लंकेच्या एकदिवसीय संघाची धुरा लाहिरू थिरिमानेच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तो म्हणाला की, पाकिस्तानमध्ये आम्हाला कडक सुरक्षा देण्यात येणार असल्याचं आश्वासन मिळालं आहे. त्यामुळं कोणतीही चिंता नाही.

दहा वर्षापूर्वी 2009मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकेच्या संघावर गद्दाफी मैदानाबाहेर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात लंकेच्या संघातील काही खेळाडू जखमी झाले होते. या घटनेनंतर जगातील सर्व संघाने पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता.

पाकिस्तानने अनेक प्रयत्न केल्यानंतर अखेर श्रीलंकेने क्रिकेट खेळण्यास होकार दिला होता. पाकिस्तान दौऱ्याचे स्वरुप निश्चित झाल्यानंतर लंकेच्या 10 खेळाडूंनी पाक दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले.

फ्रान्सिस दिब्रिटोंच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेचा तीव्र विरोध, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: srilanka
First Published: Sep 24, 2019 01:33 PM IST

ताज्या बातम्या