मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सहा महिन्यांपूर्वी टेस्ट टीमचा कॅप्टन, आता लष्करामध्ये दाखल झाला क्रिकेटपटू

सहा महिन्यांपूर्वी टेस्ट टीमचा कॅप्टन, आता लष्करामध्ये दाखल झाला क्रिकेटपटू

क्रिकेटमध्ये संघर्षमय प्रवास करून यश मिळवलेली अनेक उदाहरणं आपण बघितली आहेत, पण प्रत्येक खेळाडूला हे यश पचवणं आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणं जमतच असं नाही. अनेकवेळा क्रिकेट बोर्डांच्या चुकीच्या निर्णयांचा फटकाही क्रिकेटपटूला बसतो.

  • Published by:  Shreyas

कोलंबो, 13 जुलै : क्रिकेटमध्ये संघर्षमय प्रवास करून यश मिळवलेली अनेक उदाहरणं आपण बघितली आहेत, पण प्रत्येक खेळाडूला हे यश पचवणं आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणं जमतच असं नाही. अनेकवेळा क्रिकेट बोर्डांच्या चुकीच्या निर्णयांचा फटकाही क्रिकेटपटूला बसतो, याचं ताजं उदाहरण म्हणजे श्रीलंका क्रिकेट. गेल्या काही दिवसांपासून श्रीलंका क्रिकेट (Sri Lanka Cricket) वाईट काळातून जात आहे. बोर्डाने टीमच्या खराब कामगिरीनंतर अनेक कर्णधार बदलले, पण याचा काहीच फायदा झाला नाही. श्रीलंकेचा माजी कर्णधार दिनेश चंडीमल (Dinesh Chandimal) यालाही खराब कामगिरीचा फटका बसला.

2021 च्या सुरुवातीला दिनेश चंडीमल श्रीलंकेच्या टेस्ट टीमचा कर्णधार होता, पण तीन महिन्यानंतर त्याचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं. एवढच नाही तर त्याला टीममधूनही बाहेर करण्यात आलं. यानंतर त्याच्या आयुष्याने वेगळं वळण घेतलं.

दिनेश चंडीमलने जानेवारी 2021 मध्ये श्रीलंका आर्मी वॉलिंटियर फोर्समध्ये प्रवेश मिळवला. त्याला आर्मीच्या क्रिकेट टीमकडून खेळण्याची ऑफर मिळाली होती, ही ऑफर त्याने स्वीकारली. श्रीलंका टीममधून बाहेर गेल्यानंतर चंडीमल आता नवीन काम करत आहे.

England vs Sri Lanka 2021: We were Outplayed, Admits Sri Lanka Skipper Dinesh Chandimal

श्रीलंकन लष्करात दिनेश चंडीमलला मेजर रँक मिळाला आहे. लष्कराच्या गणवेशातला त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी चंडीमलला टीममधून बाहेर करण्यात आलं होतं, यानंतर श्रीलंकेचे क्रिकेट चाहते हैराण झाले होते.

First published:

Tags: Cricket, Sri lanka