श्रीलंकेचा भारतावर 7 गडी राखून विजय

श्रीलंकेचा भारतावर 7 गडी राखून विजय

नाणेफेक जिंकून श्रीलंकेने आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ ११२ धावांवर ऑलआऊट झाला.

  • Share this:

10 ऑक्टोबर: श्रीलंकेविरूद्ध धर्मशाळा इथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.   श्रीलंकेने 7 गडी राखून भारतावर केवळ 20 षटकात विजय मिळवला आहे.

श्रीलंक विरूद्धच्या  कसोटी मालिकेत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने धर्मशाळा येथे सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेसमोर नांगी टाकली आहे. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  भारतीय संघ ११२ धावांवर  ऑलआऊट झाला.  विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने खराब कामगिरीचं दर्शन दिलंय. महेंद्रसिंग धोनीच्या एकतर्फी झुंजमुळे भारतीय संघाने ११२ धावांपर्यंत मजलं मारली.धोनीने ६५ धावा काढल्यात.त्यामुळे श्रीलंकेसमोर फक्त 113 धावांचं आव्हान होतं. हे आव्हान श्रीलंकेने लीलया पेलले. फक्त 20.3 षटकाच श्रीलंकेने विजयाला  गवसणी घातली. भारतीय गोलंदाजांना मात्र तीन श्रीलंकम फलंदाजांना तंबूत पाठवण्यात यश मिळाले आहे.

तीन  सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये    पहिल्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला आहे. त्यामुळे ही मालिका जिंकण्यासाठी   आता उर्वरित दोन सामने भारताला जिंकावे लागतील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2017 06:16 PM IST

ताज्या बातम्या