मुंबई, 21 मे : कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) आधीच क्रिकेट स्पर्धा कमी झाल्या असताना आता भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) सीरिजवर नवं संकट ओढावलं आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket) खेळाडूंसोबत केलेला करार सार्वजनिक केल्यामुळे खेळाडू बोर्डावर नाराज झाले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी देशातून निघायच्या काही तास आधीच बोर्डाने वादग्रस्त करारावर स्वाक्षरी घ्यायचा प्रयत्न केला, असा आरोप श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne), एंजलो मॅथ्यूज (Angelo Mathews) आणि दिनेश चंडीमल (Dinesh Chandimal) यांनी त्यांचं मानधन कमी केल्यामुळे या करारावर स्वाक्षरी करायला नकार दिला आहे. जर हा वाद सोडवला गेला नाही, तर भारत आणि श्रीलंका सीरिजही अडचणीत येऊ शकते.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नव्या कराराबाबत माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. नव्या करारानुसार खेळाडूंचं मूळ वेतन कमी करण्यात आलं, याचं कारण खेळाडूंचं प्रदर्शन असल्याचं सांगण्यात आलं.
New contracts for Sri Lanka’s cricketers has been a bone of contention. Several players will get pay cuts with Mathews losing USD 50,000. Karunaratne will lose 30k while Lakmal will miss out 45k. Players want formula on which Contract Grades were done explained. Won’t sign until. pic.twitter.com/v3pdswwT2W
— Rex Clementine (@RexClementine) May 15, 2021
श्रीलंका टीमचे 24 खेळाडूंचं अधिकृत प्रतिनिधी निशान सिडनी प्रेमथिरत्ने यांनी खेळाडू निराश आणि हैराण असल्याचं सांगितलं. 'श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन खेळाडूंच्या कराराबाबत सगळी माहिती दिली, यात खेळाडूंना किती मानधन मिळालं, हेदेखील सांगण्यात आलं. खेळाडूंना बंदुकीच्या धाकावर ठेवू नका. कोणताही क्रिकेटपटू अनुचित आणि पारदर्शक नसलेल्या करारावर हस्ताक्षर करणार नाही,' असं प्रेमथिरत्ने म्हणाले.
'श्रीलंका क्रिकेट बोर्डाने टीम बांगलादेशला रवाना होण्याआधी काही तास खेळाडूंकडून सही घ्यायचा प्रयत्न केला. खेळाडूंची चिंता बोर्डाने लक्षात घेतली नाही. याशिवाय कायदेशीर गोष्टींना करारात औपचारिक रूप देण्यात आलेलं नाही. खेळाडूंवर विश्वास कायम ठेवण्यासाठी हा वाद मिटवण्यात यावा,' अशी मागणी खेळाडूंच्या प्रतिनिधीने केली.
याचसोबत खेळाडूंना मिळालेल्या मानधनाच्या रकमेचा खुलासा करणं हे खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे, असा आरोपही खेळाडूंनी केला आहे. तसंच कशाच्या आधारावर खेळाडूंना ग्रेडिंग देण्यात आलं? असा सवालही खेळाडूंनी उपस्थित केला आहे. द संडे टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार फिटनेस, अनुशासन, मागच्या दोन वर्षातली आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधली कामगिरी, टीमसाठीचं नेतृत्व या चार भागांमध्ये ग्रेडिंगची विभागणी केली गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India Vs Sri lanka