• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • स्ट्रीकनंतर आणखी एक क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी, 8 वर्षांसाठी निलंबन

स्ट्रीकनंतर आणखी एक क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी, 8 वर्षांसाठी निलंबन

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहरा लोकुहितगे (Dilhara Lokuhettige) याच्यावर आयसीसीने (ICC) 8 वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे.

 • Share this:
  दुबई, 19 एप्रिल : झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि फास्ट बॉलर हीथ स्ट्रीक (Heath Streak) याच्यावर मागच्या आठवड्यात भ्रष्टाचारप्रकरणी 8 वर्षांची बंदी घालण्यात आली, त्यानंतर आता आणखी एक क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहरा लोकुहितगे (Dilhara Lokuhettige) याच्यावरही आयसीसीने 8 वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे. आयसीसीच्या (ICC) भ्रष्टाचार विरोधी लवादाला लोकुहितगे दोषी आढळला. 3 एप्रिल 2019 पासून लोकुहितगेचं निलंबन सुरू झालं आहे, कारण त्यावेळीच त्याच्यावर पहिल्यांदा कारवाई करण्यात आली होती. सुनावणी तसंच लेखी आणि तोंडी प्रतिवादानंतर लोकुहितगे दोषी आढळल्याचं निष्पन्न झाल्याचं आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी लवादाने सांगितलं आहे. लोकुहितगे आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी नियम 2.1.1, 2.1.4 आणि 2.4.4 मध्ये दोषी आढळला. लोकुहितगेने मॅच फिक्सिंग केली, तसंच समोर फिक्सिंग होत असताना त्याने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला याबाबतची माहिती दिली नाही, असं लवादाने स्पष्ट केलं आहे. याशिवाय लोकुहितगेवर एमिरट्स क्रिकेट बोर्डाकडूनही भ्रष्टाचारविरोधी नियम तोडल्याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. एमिरट्स क्रिकेट बोर्डाच्या टी-10 लीगमध्येही लोकुहितगेवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. दिलहरा लोकुहितगेने आयसीसीच्या अनेक भ्रष्टाचारविरोधी शिक्षणाच्या सत्रांमध्ये भाग घेतला होता, त्यामुळे त्याला आपण करत असलेल्या गोष्टी नियमाविरोधात आहेत, हे माहिती होतं, असं आयसीसीचे जनरल मॅनेजर एलेक्स मार्शल म्हणाले आहेत. लोकुहितगेवरचे आरोप गंभीर स्वरुपाचे होते, तसंच त्याने कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नसल्याची प्रतिक्रिया मार्शल यांनी दिली.
  Published by:Shreyas
  First published: