मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL : श्रीलंकेची टीम धक्क्यात, विमानाचं इंधन संपलं, पायलटने पुढे काय केलं पाहा

IND vs SL : श्रीलंकेची टीम धक्क्यात, विमानाचं इंधन संपलं, पायलटने पुढे काय केलं पाहा

श्रीलंका क्रिकेट टीमसमोरच्या (Sri Lanka Cricket) अडचणी काही संपताना दिसत नाहीयेत. मैदानामध्ये टीमला वारंवार पराभवाचा सामना करावा लागत आहे, तर आता मैदानाबाहेरही टीमच्या खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

श्रीलंका क्रिकेट टीमसमोरच्या (Sri Lanka Cricket) अडचणी काही संपताना दिसत नाहीयेत. मैदानामध्ये टीमला वारंवार पराभवाचा सामना करावा लागत आहे, तर आता मैदानाबाहेरही टीमच्या खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

श्रीलंका क्रिकेट टीमसमोरच्या (Sri Lanka Cricket) अडचणी काही संपताना दिसत नाहीयेत. मैदानामध्ये टीमला वारंवार पराभवाचा सामना करावा लागत आहे, तर आता मैदानाबाहेरही टीमच्या खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मुंबई, 7 जुलै : श्रीलंका क्रिकेट टीमसमोरच्या (Sri Lanka Cricket) अडचणी काही संपताना दिसत नाहीयेत. मैदानामध्ये टीमला वारंवार पराभवाचा सामना करावा लागत आहे, तर आता मैदानाबाहेरही टीमच्या खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार इंग्लंडमधून परतत असणाऱ्या श्रीलंकन टीमच्या विमानामध्ये मोठा बिघाड झाला. श्रीलंकेला येत असताना विमानाचं इंधन संपलं, त्यामुळे विमानचं लॅण्डिंग भारतात करण्यात आलं, असं टीमचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी सांगितलं आहे.

मिकी आर्थर (Miky Arthur) टॉल्क स्पोर्टसोबत बोलत होते. 'आमच्या विमानाचं लॅण्डिंग भारतात करावं लागलं, कारण विमानाचं इंधन संपलं होतं. डेव्हा आमचं विमान भारतात उतरलं तेव्हा, मला इंग्लडचे ऑपरेशन मॅनेजर वेन बेंटली यांचा मेसेज आला. त्यांनीच मला विमानाचं इंधन संपल्याची माहिती दिली. या घटनेमुळे संपूर्ण टीम तणावात आहे,' असं आर्थर म्हणाले.

विमानामध्ये इंधन भरल्यानंतर टीम श्रीलंकेमध्ये पोहोचली. सध्या खेळाडू हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. श्रीलंकेत परतताच बोर्डाने इंग्लंडमधून आलेल्या सगळ्या खेळाडूंना एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन केलं. इंग्लंड टीममधले 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आले, यानंतर श्रीलंका बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) खेळाडूंना घरी पाठवण्याची परवानगी नाकारली.

श्रीलंकेच्या सगळ्या खेळाडूंची एन्टीजेन टेस्ट करण्यात आली, यानंतर त्यांना हॉटेलमध्ये पाठवण्यात आलं. आता खेळाडूंच्या आरटी-पीसीआर टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहिली जात आहे.

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजआधी श्रीलंका टीमला (India vs Sri Lanka) मोठा धक्का लागला आहे. टीमचा माजी कर्णधार एन्जलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याने सीरिज खेळायला नकार दिला आहे, तसंच तो निवृत्त होणार असल्याचंही वृत्त आहे. मॅथ्यूजने बोर्डासोबत सुरू असलेल्या कराराच्या वादामुळे माघार घेतल्याचं सांगितलं जात आहे. श्रीलंकेच्या 30 पैकी 29 खेळाडूंनी नव्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

वनडे आणि टी-20 सीरिजसाठी श्रीलंकन टीमची घोषणा करण्यात आलेली नाही. श्रीलंकेचा बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये पराभव झाला. मागच्या एका वर्षात टीमने फक्त 1 वनडे, 1 टी-20 आणि 1 टेस्ट मॅचच जिंकली.

भारतीय टीम : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया नेट बॉलर : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग

First published:
top videos

    Tags: Cricket, India Vs Sri lanka, Sri lanka