IPL 2021 : 'आमच्याकडे आयपीएल खेळवा', या देशाने BCCI ला दिली ऑफर

IPL 2021 : 'आमच्याकडे आयपीएल खेळवा', या देशाने BCCI ला दिली ऑफर

खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोना झाल्यामुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल (IPL 2021) 29 सामन्यांनंतर स्थगित करण्यात आली. आता उरलेले सामने कुठे होणार याबाबत अजून बीसीसीआयने (BCCI) काहीही स्पष्ट सांगितलं नाही.

  • Share this:

मुंबई, 7 मे : खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोना झाल्यामुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल (IPL 2021) 29 सामन्यांनंतर स्थगित करण्यात आली. आता उरलेले सामने कुठे होणार याबाबत अजून बीसीसीआयने (BCCI) काहीही स्पष्ट सांगितलं नाही, पण युएई (UAE) आणि इंग्लंड (England) हे दोन पर्याय असल्याचं समोर येत आहे. इंग्लंडमधल्या चार काऊंटी क्लबनी तिकडे आयपीएलचे उरलेले सामने खेळवण्याची ऑफर बीसीसीआयला दिली आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर आणि टी-20 वर्ल्ड कपच्या आधी युएई किंवा इंग्लंडमध्ये आयपीएलचे उरलेले सामने होऊ शकतात. असं असतानाच आता श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही (Sri Lanka Cricket) बीसीसीआयला आमच्याकडे आयपीएल खेळवण्याची ऑफर दिली आहे.

टी-20 वर्ल्ड कपआधी आयपीएलसाठी वेळ उपलब्ध करता येईल का? याबाबत इतर बोर्डांसोबत चर्चा करावी लागेल, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाला. आयपीएलचे उरलेले सामने खेळवले गेले नाहीत, तर बीसीसीआयला 2,500 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली.

श्रीलंका क्रिकेटच्या मॅनेजिंग कमिटीचे प्रमुख अर्जुना डिसिल्व्हा यांनी सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत आयपीएलचं आयोजन करता येऊ शकतं, असं सांगितलं. लंका प्रिमियर लीगचं जुलै-ऑगस्ट महिन्यात आयोजन करण्याचा आमचा विचार आहे. युएईसोबतच श्रीलंकेच्या पर्यायाचाही बीसीसीआयने विचार करावा, असं डिसिल्व्हा म्हणाले.

भारतातली आयपीएल रद्द झाल्यामुळे आता टी-20 वर्ल्ड कपबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे, पण कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली, तर मात्र वर्ल्ड कप युएईमध्ये खेळवला जाऊ शकतो.

जवळपास अर्धी आयपीएल झाल्यानंतर बायो-बबलमध्ये कोरोनाने शिरकाव केला. केकेआरचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. यानंतर चेन्नई सुपरकिंग्समध्ये बॉलिंग प्रशिक्षक एल बालाजी आणि माईक हसी तसंच आणखी दोघांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. दिल्लीचा अमित मिश्रा आणि हैदराबादचा ऋद्धीमान साहा यांनाही कोरोनाची लागण झाली, त्यामुळे बीसीसीआयला अखेर आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

Published by: Shreyas
First published: May 7, 2021, 6:06 PM IST

ताज्या बातम्या