Home /News /sport /

मुंबई इंडियन्सचा महान खेळाडू T20 वर्ल्ड कप खेळणार! बोर्डाने सुरू केली चर्चा

मुंबई इंडियन्सचा महान खेळाडू T20 वर्ल्ड कप खेळणार! बोर्डाने सुरू केली चर्चा

वर्ल्ड कपसाठी निवड होण्यासाठी खेळाडूंना फिटनेस टेस्ट पास करावी लागेल, याचसोबत त्यांना स्थानिक क्रिकेट खेळणंही बंधनकारक आहे.

    मुंबई, 17 मे : बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. आयपीएल स्थगित झाल्यामुळे आता यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कपही (T20 World Cup) भारतात होण्याची शक्यता मावळली आहे. भारतात कोरोनाचा प्रभाव असाच कायम राहिला, तर यंदाचा टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये होऊ शकतो. या टी-20 वर्ल्ड कपबाबत अजून अनिश्चितता असली तरी श्रीलंका क्रिकेट बोर्डने (Sri Lanka Cricket Board) यासाठी तयारी सुरू केली आहे. या वर्ल्ड कपसाठी महान क्रिकेटपटू लसिथ मलिंगा (Lasith Malinga) मैदानात उतरू शकतो. मागच्या वर्षभरापासून मलिंगाने एकही मॅच खेळलेली नाही, पण श्रीलंका क्रिकेट बोर्ड त्याच्यासोबत चर्चा करत आहे. लसिथ मलिंगा चांगला खेळाडू आहे, पण त्याला नव्या नियमानुसार जावं लागेल. खेळाडूंना 2 किमीची शर्यत 8 मिनीट 30 सेकंदामध्ये पूर्ण करायची आहे, असं निवड समिती अध्यक्ष प्रमोदया विक्रमसिंघे म्हणाले. या नियमाबाबत आपण मलिंगाशी बोललो आहोत, असंही विक्रमसिंगे यांनी सांगितलं. लसिथ मलिंगा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनवेळा हॅट्रिक घेणारा एकमेव बॉलर आहे, यामध्ये 4 बॉलमध्ये 4 विकेटचा समावेश आहे. गर्लफ्रेंडला Birthday विश करताना इंग्लंडचा खेळाडू झाला भावुक, म्हणाला I'm Sorry लसिथ मलिंगा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, त्याचं खेळणं आमच्यासाठी महत्त्वाचं असेल, पण प्रत्येक खेळाडूसाठी नियम सारखाच आहे. याबाबत मलिंगालाही सांगण्यात आलं आहे, तेव्हा तो आपण जवळपास दीड वर्ष क्रिकेट खेळलो नसल्याचं म्हणाला, असं वक्तव्य विक्रमसिंघे यांनी डेली न्यूजशी बोलताना सांगितलं. IPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO वर्ल्ड कपसाठी निवड होण्यासाठी खेळाडूंना फिटनेस टेस्ट पास करावी लागेल, याचसोबत त्यांना स्थानिक क्रिकेट खेळणंही बंधनकारक आहे. जर मलिंगा स्थानिक क्रिकेट खेळला तर तो निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जाईल, असं विक्रमसिंगे म्हणाले. मलिंगाने मात्र याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मलिंगाने 84 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 107 विकेट घेतल्या. आयपीएल इतिहासात मलिंगा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) सर्वाधिकवेळा आयपीएल चॅम्पियन बनवण्यातही मलिंगाने मोलाची भूमिका बजावली होती.
    First published:

    Tags: Cricket, IPL 2021, Mumbai Indians

    पुढील बातम्या