• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा तीन खेळाडूंना दणका, एका वर्षासाठी केलं निलंबन

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा तीन खेळाडूंना दणका, एका वर्षासाठी केलं निलंबन

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) त्यांच्या तीन क्रिकेटपटूंवर कारवाई केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर असताना बायो-बबलचा नियम मोडल्यामुळे कुसल मेंडिस (Kusal Mendis), निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) आणि धनुष्का गुणतिलका (Danushka Gunathilaka) यांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं आहे.

 • Share this:
  कोलंबो, 30 जुलै : श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) त्यांच्या तीन क्रिकेटपटूंवर कारवाई केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर असताना बायो-बबलचा नियम मोडल्यामुळे कुसल मेंडिस (Kusal Mendis), निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) आणि धनुष्का गुणतिलका (Danushka Gunathilaka) यांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं आहे. जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर असताना हे तिन्ही खेळाडू तिसऱ्या टी-20 नंतर डरहममधल्या हॉटेलमधून बाहेर गेले. हॉटेल बाहेरच्या रस्त्यावर खेळाडू सिगरेट पिताना आढळले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. तिन्ही खेळाडूंचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांना तडकाफडकी मायदेशी बोलावलं. यानंतर तिन्ही खेळाडूंची चौकशी करण्यात आली आणि आता त्यांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं आहे. बायो-बबल तोडल्यामुळे आणि चौकशी सुरू असल्यामुळे या तिघांची भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी श्रीलंकेच्या टीममध्ये निवड झाली नव्हती. कुशल मेंडिस, निरोशन डिकवेला आणि धनुष्का गुणतिलका हे तिन्ही खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये अपयशी ठरले. मेंडिसने 3 मॅचमध्ये 54 रन, डिकवेलाने 2 सामन्यांमध्ये 14 रन आणि गुणतिलकाने 3 मॅचमध्ये 26 रन केले.
  Published by:Shreyas
  First published: