IPL 2019 : डेव्हिड-बेअरस्टो जोडी हिट, हैदराबादचा कोलकातावर एकहाती विजय

या विजयानंतर हैदराबादचा संघ आता चौथ्या स्थानावर आहे. तर, कोलकाताचा संघ 6 स्थानावर आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 07:18 PM IST

IPL 2019 : डेव्हिड-बेअरस्टो जोडी हिट, हैदराबादचा कोलकातावर एकहाती विजय

हैदराबाद, 21 एप्रिल : प्ले ऑफच्या लढतीती हैदराबादचा संघ आता एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. आज आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादनं कोलकातावर एकहाती विजय मिळवला. बेअरस्टोनं 15व्या ओव्हरमध्येच सामना संपवला.हैदराबादनं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णय हैदराबादच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. आणि कोलकातला केवळ 159 धावांवर रोखले. दरम्यान प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबादला आश्वासक सुरुवात करून दिली. या दोघांनी पॉवर प्लेमध्येच 72 धाव चोपून काढल्या. या जोडीने शतकी भागीदारी करताना आयपीएलमध्ये एका विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमधील या दोघांची ही चौथी शतकी भागीदारी आहे.


Loading...


दरम्यान, पराभव डोळ्यासमोर दिसताना कोलकाताच्या क्षेत्ररक्षकांनी ढिसाळ कामगिरी केली. त्यांनी दोन सोपे झेल सोडले. परंतु अखेरीस 13व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पृथ्वी राजने वॉर्नरचा त्रिफळा उडवला. वॉर्नरने 38 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार खेचून 67 धावा केल्या. वॉर्नरनं आयपीएलमध्ये आपल्या 500 धावाही पुर्ण केल्या.या विजयानंतर हैदराबादचा संघ आता चौथ्या स्थानावर आहे. तर, कोलकाताचा संघ 6 स्थानावर आहे.

दरम्यान पहिल्यांदा फलंदाजी करताना, ख्रिस लीन आणि सुनील नरीन यांनी हैदराबादने दिलेले प्रथम फलंदाजीचे आव्हान स्वीकारत दमदार सुरुवात केली. या दोघांनी 2.3 षटकांत 42 धावा चोपल्या. हैदराबादच्या खलील अहमदच्या तिसऱ्या षटकात नरीनने 6,4,4 अशी फटकेबाजी केली, परंतु खलीलने चौथ्या चेंडूवर नरीनचा दांडा उडवला. नरीन 8 चेंडूंत 25 धावा करून माघारी परतला.पाचव्या षटकात खलीलने कोलकाताला आणखी एक धक्का दिला. त्याने शुबमन गिलला झेलबाद केले. कोलकाताला 50 धावांवर दोन झटके बसले. कोलाकाताने पॉवर प्लेमध्ये 2 बाद 62 धावा केल्या. हैदराबादविरुद्धची ही कोणत्याही संघाने यंदाच्या हंगामात पॉवर प्लेमध्ये केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. लीन आणि नितीश राणा ही जोडी कोलकाताला तारेल असे वाटत असताना भुवनेश्वर कुमारने धक्का दिला. त्याने राणाला यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या रसेलला चांगली फलंदाजी करता आली नाही.


VIDEO : राहुल गांधींवर टीका करताना पंकजा मुंडेंची जीभ घसरली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Apr 21, 2019 05:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...