IPL 2019 : बंगळुरूचा लाजीरवाणा पराभव, 118 धावांनी हैदराबादनं जिंकला सामना

IPL 2019 : बंगळुरूचा लाजीरवाणा पराभव, 118 धावांनी हैदराबादनं जिंकला सामना

232 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ 113 धावातच बाद झाला.

  • Share this:

हैदराबाद, 31 मार्च : आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या विराटचा मात्र साजेशी कामगिरी आजही करु शकला नाही. त्यामुळं बंगळुरूचा संघ 113 धावातरच गारद झाला.



231 धावांचा डोंगर पार करण्यासाठी बंगळुरूच्या फलंदाजांवर मदार असताना, विराटची सेना एका मागोमाग एक माघारी परतली. प्रयास रे बर्मन आणि डी ग्रँडहोम यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघर्ष केला. पण त्यांचा संघर्षांला यश आले नाही.

याला कारण ठरलं ते अफगाणी गोलंदाज मोहम्मद नाबी. नाबीनं बंगळुरूच्य चार फलंदाजांना तंबुत पाठवले. 231 धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. भुवनेश्वर कुमारनं मोहम्मद नबी नावाचं आपलं अफगाण फॅक्टर उतरवले, आणि बंगळुरूचा सलामीवीर पार्थिव पटेलला बाद केले.



प्रथम टॉस जिंकत विराटनं घेतलेला गोलंदाजीचा निर्णय योग्य होता की नाही, याबाबत आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कारण डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या आतषबाजीमुळं हैदराबादनं 17 ओव्हरमध्येच 200चा पल्ला गाठला. वॉर्नर आणि बेअरस्टो यांच्या जोडीनं 185 धावांची भागीदारी केली. या दोघांनी मिळून बंगळुरूच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोवने ५२ चेंडूंत आपले शतक पूर्ण केलं. तर, वॉर्नरनं 53 चेंडूत आपलं शतक पुर्ण केले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील त्याचे हे दुसरे शतक ठरले. 16व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेत जॉनी बेअरस्टोनं शतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. त्याने 52 चेंडूंत 102 धावा पूर्ण केल्या. एकीकडे बेअरस्टो फटकेबाजी करत असताना डेव्हिड वॉर्नरने त्याला चांगली साथ दिली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. याबरोबरच हैदराबादने दीडशतकी सलामी ठोकली.


मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 03:35 PM IST

ताज्या बातम्या