IPL 2019 : हैदराबादनं एकाच बॉलमध्ये केला 'हा' पराक्रम, पाहा VIDEO

IPL 2019 : हैदराबादनं एकाच बॉलमध्ये केला 'हा' पराक्रम, पाहा VIDEO

जेव्हा एका बॉलवर दोन फलंदाजांना बाद करण्याचा हैदराबादचा प्लॅन फसतो तेव्हा...

  • Share this:

हैदराबाद, 31 मार्च : आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या विराटचा मात्र साजेशी कामगिरी आजही करु शकला नाही. त्यामुळं बंगळुरूचा संघ 113 धावातच गारद झाला. प्रथम टॉस जिंकत विराटनं गोलंदाजीचा निर्णय घेतला पण गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करता आली नाही. परिणामी डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या आतषबाजीमुळं हैदराबादनं 17 ओव्हरमध्येच 200चा पल्ला गाठला.

यावेळी 18व्या षटकात एक अजब प्रसंग घडला, जेव्हा हैदराबादनं एकाच चेंडूत बंगळुरूच्या फलंदाजाचा दोनदा रनआऊट केले. भुवनेश्वर कुमारनं केलेल्या थ्रोवर गोलंदाज शंकरनं बंगळुरूच्या फलंदाजाला एकदा नाही तर, दोनदा बाद केले. पण बंगळुरूचा मोहम्मद सिराज आणि डी ग्रँडहोम यांनी 18 ओव्हरमध्ये एक धाव घेताना दोन्ही फलंदाज एकमेकांसमोर आले. त्यामुळं शंकरनं स्ट्राईकरअण्डला असलेल्या डी ग्रँडहोमला बाद केले.वॉर्नर आणि बेअरस्टो यांच्या जोडीनं 185 धावांची भागीदारी केली. या दोघांनी मिळून बंगळुरूच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोवने ५२ चेंडूंत आपले शतक पूर्ण केलं. तर, वॉर्नरनं 53 चेंडूत आपलं शतक पुर्ण केले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील त्याचे हे दुसरे शतक ठरले. 16व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेत जॉनी बेअरस्टोनं शतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. त्याने 52 चेंडूंत 102 धावा पूर्ण केल्या. एकीकडे बेअरस्टो फटकेबाजी करत असताना डेव्हिड वॉर्नरने त्याला चांगली साथ दिली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. याबरोबरच हैदराबादने दीडशतकी सलामी ठोकली.


मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 08:32 PM IST

ताज्या बातम्या