...म्हणून द्युतीनं जगजाहीर केली ‘ती’ खासगी गोष्ट

...म्हणून द्युतीनं जगजाहीर केली ‘ती’ खासगी गोष्ट

भारताची धावपटू द्युती चंदने समलैंगिक असल्याचा खुलासा केला होता.

  • Share this:

ओडिशा, 21 मे : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला दोन रौप्य मिळवून देणाऱी धावपटू द्युती चंदने हिनं शनिवारी एका मुलाखतीत तिच्या जीवनाबद्दल एक मोठा गौप्यस्पोट केला. यावेळी तिनं आपले काही वर्षांपासून समलैंगिक संबंध असल्याचे सांगितले. मात्र, आपण गावातच असलेल्या मैत्रिणीसोबत माझे संबंध असून तिची ओळख सांगणार नाही. विनाकारण ती लोकांच्या नजरेत येणं मला पसंद नाही, असा खुलासाही केला होता.दरम्यान, भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच कोणत्या तरी महिला खेळाडूनं सार्वजनिकरित्या समलैंगिक असल्याचा दावा केला आहे. त्यामुळं द्युतीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होतं असले तरी तिच्या मोठ्या बहिणीने नाराजी व्यक्त केली आहे.

वाचा- World Cup : 1 ट्रॉफी, 46 दिवस, 10 संघ...या दिवशी असतील भारताचे सामने

एवढंच नाही तर घरातून बाहेर काढण्याची आणि तुरुंगात पाठवू अशी धमकी बहिणीने दिल्याचं द्युतीने सांगितंल. मात्र द्युतीला आपल्या आयुष्यातील ही सर्वात मोठी गोष्ट सांगण्याचा निर्णय का घ्यावा लागला याचे कारण आता समोर आले आहे. आज दुपारी खुद्द द्युतीनं पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला.

वाचा- World Cup : 'या' खेळाडूंनी मिळवून दिला वर्ल्ड चॅम्पियनचा ताज, त्यांनाच विराटकडून डच्चू

द्युती चंदने आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. तीने 11.28 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्य पदक पटकावलं होतं. आगामी वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि टोकियो ऑलिम्पिक 2020 साठी तिचा सराव सुरू आहे.दरम्यान, गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 वर ऐतिहासिक निर्णय दिला. माझं स्वप्न होतं की मला असा साथीदार मिळावा जो मला आयुष्यभर साथ देईल. मला खेळाडू म्हणून प्रेरणा देईल. मी गेल्या 10 वर्षांपासून धावत आहे आणि पुढची 5 ते 7 वर्ष खेळेन. अशावेळी मला कोणाचीतरी साथ हवी असंही द्युती चंदने म्हटलं आहे. तसेच, याबाबत सर्वांसमोर हा खुलासा करावा लागला याबद्दल बोलताना द्युतीनं, ''माझी बहीण सतत ब्लॅकमेल करत होती. तिने माझ्याकडे 25 लाखांची मागणी केली होती. एकदा तर तिने मला मारहाणही केली. त्याबाबत मी पोलिसात तक्रारही केली आहे. तिच्या या ब्लॅकमेल करण्यामुळेच मला हे जगजाहीर करावे लागले.'' , असे सांगितले.


वाचा- World Cup : '...तर आम्हाला चॅम्पियन होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही'द्युतीने 100 मीटर स्पर्धेत 20 वर्षांत भारताला प्रथमच पदक मिळवून होते. द्युतीने 11.32 सेकंदाची वेळ नोंदवली. 200 मीटर शर्यतीत द्युतीने 23.20 सेकंदांची वेळ नोंदवली. एकाच आशियाई स्पर्धेत 100 मी. व 200 मी. शर्यतीत पदक जिंकणारी ती चौथी भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले असले तरी, घरच्यांनी मात्र या निर्णयाला विरोध केला आहे.

वाचा- World Cup : 1 ट्रॉफी, 46 दिवस, 10 संघ...या दिवशी असतील भारताचे सामने

वाचा- World Cup : 'फक्त भारतीय लष्करासाठी आम्ही वर्ल्ड कपमध्ये लढणार'

वाचा- World Cup : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भारतीय संघात कोणतेही बदल नाहीत


VIDEO : वर्ल्डकपसाठी काय आहे टीमचा प्लॅन? विराट कोहलीची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 07:55 PM IST

ताज्या बातम्या