सायना-पारुपल्ली मालदीवमध्ये करतायत सुट्टी एन्जॉय, पाहा Photo

सायना-पारुपल्ली मालदीवमध्ये करतायत सुट्टी एन्जॉय, पाहा Photo

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. सायनाने पारुपल्लीसोबतचे मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावरचे फोटो ट्विट केले आहेत. डिसेंबर 2018 साली या दोघांनी लग्न केलं. सायना आणि पारुपल्ली कश्यप 10 वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. मी हरियाणाची आणि पारुपल्ली हैदराबादचा होता, आंतरजातीय विवाहांना आपल्या समाजात अजूनही वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं, त्यामुळे आम्हाला 10 वर्ष ही गोष्ट लपवावी लागली, असं सायना नेहवाल तेव्हा म्हणाली होती.

सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक, तर कॉमनवेल्थमध्ये दोनवेळा सुवर्ण पदक पटकावलं आहे. तसंच सायना जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावरही होती. तर पारुपल्ली कश्यप लंडन ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचला होता. पारुपल्ली कश्यप जागतिक क्रमवारीमध्ये 24व्या क्रमांकावर आहे.

काहीच दिवसांपूर्वी सायना आणि पारुपल्ली यांनी डेनमार्क ओपनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. जानेवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या आशियाई टूरमधून आपण पुन्हा खेळायला सुरुवात करु, असं सायनाने सांगितलं होतं.

वर्ल्ड बॅडमिंटन संघाने याआधी थॉमस ऍण्ड उबेर कप फायनल्स आणि आशियातल्या तीन स्पर्धा आणि डेन्मार्क मास्टर्स या स्पर्धा रद्द केल्या होत्या. या सत्रातली फक्त डेन्मार्क ओपन ही स्पर्धातच कायम ठेवण्यात आली होती. जर तीन स्पर्धा होणार असत्या, तर डेन्मार्क ओपन खेळण्यात अर्थ होता, अशी प्रतिक्रिया सायना नेहवालने दिली होती.

Published by: Shreyas
First published: October 28, 2020, 6:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या