Home /News /sport /

प्रसिद्ध मॉडेलचा गौप्यस्फोट: 'एका रात्रीसाठी खेळाडूनं ऑफर केली मोठी रक्कम'

प्रसिद्ध मॉडेलचा गौप्यस्फोट: 'एका रात्रीसाठी खेळाडूनं ऑफर केली मोठी रक्कम'

'त्या खेळाडूनं आपल्याला 50 हजार युरोची ऑफर दिली होती. मी तो प्रस्ताव तातडीनं फेटाळला. एका राष्ट्रीय टीममधील खेळाडू इतकी खालच्या पातळीवर घसरेल याचा मी कधीही विचार केला नव्हता', असा दावा या मॉडेलनं केला आहे.

    मुंबई, 9 ऑक्टोबर : जगभरात खेळाडूंना त्यांच्या कौशल्यामुळे नेहमी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळते. त्यांच्या प्रत्येक गोष्टींचं फॅन अनुकरण करत असतात. पण, त्याचवेळी त्यांची वादग्रस्त बाजू समोर आल्यानंतर होणारा भूकंप हा मोठा असतो. फ्रान्समध्येही सध्या तेच घडतंय. रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार आणि OnlyFan ब्यूटी नताली एंड्रियानी (Nathalie Andreani) हिनं फ्रान्सच्या राष्ट्रीय टीममधील फुटबॉलपटूवर केलेल्या आरोपामुळे सध्या खळबळ उडाली आहे. फ्रान्सच्या राष्ट्रीय फुटबॉल टीममधील खेळाडूनं आपल्याला सोबत रात्र घालवण्यासाठी मोठी रक्कम देऊ केली होती, असा खळबळजनक आरोप नतालीनं केला आहे. 'त्या खेळाडूनं आपल्याला 50 हजार युरोची ऑफर दिली होती. मी तो प्रस्ताव तातडीनं फेटाळला. एका राष्ट्रीय टीममधील खेळाडू इतकी खालच्या पातळीवर घसरेल याचा मी कधीही विचार केला नव्हता,' असं नतालीनं सांगितलं आहे. नतालीनं त्या फुटबॉलपटूचं नाव सांगितलेलं नाही. कोण आहे नताली? 'ब्रुनेट ब्यूटी' म्हणून ओळखली जाणारी नताली 2014 साली 'सिक्रेट स्टोरी' या फ्रेंच रिअ‍ॅलिटी टीव्ही शो मुळे सर्वप्रथम चर्चेत आली होती. त्यानंतर 2016 साली 'हार्टब्रेक व्हिला'मध्येही ती सहभागी झाली होती. 50 वर्षांची नतालीला तिच्यापेक्षा निम्म्या वयाच्या पुरूषाशी असलेल्या रिलेशनशिपमुळे अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती सध्या OnlyFans च्या माध्यमातून स्वत:चा कंटेट प्रसिद्ध करते. T20 World Cup पूर्वीच पाकचे डावपेच सुरू; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा नताली सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रीय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 3,43000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तसंच ट्विटरवर 1.3 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.  या खळबळजनक आरोपानंतर नताली पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिच्या फॉलोअर्सची संख्या देखील वेगानं वाढत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: France, Sports

    पुढील बातम्या