मुंबई, 2 ऑक्टोबर : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताला ऐतिहासिक गोल्ड मेडल जिंकून देणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) सध्या चर्चेत आहे. नव्या सिझनची सुरुवात करण्यापूर्वी सध्या तो यशाचा आनंद घेत आहे. 23 वर्षांचा नीरज सध्या मालदीवमध्ये सुट्टीवर आहे. नीरज सुट्टीवर असला तरी त्याच्या मनात कायम भालाफेकीचे (javelin throw) विचार आहेत. नीरजनं मालदीवचा एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्येही हेच दिसत आहे.
नीरजनं हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओनं सर्वांची मनं जिंकली आहेत. यामध्ये नीरज स्कूबा डायव्हिंगचा (scuba diving) करताना भाला फेकण्याचा आणि त्यानंतर आनंद करतानाचा अभिनय करताना दिसत आहे. 'आकाशात, जमिनीवर किंवा खोल पाण्यात मी नेहमी भालाफेकीचा विचार करतो. माझं ट्रेनिंग सुरु झाले आहे.' असं कॅप्शन त्यानं या व्हिडीओला दिलं आहे. यावेळी बॅकग्राऊंडमध्ये एआर रहमानचे देशभक्तीपर वंदे मातरम हे गाणं सुरू आहे.
View this post on Instagram
नीरजच्या कमाईत हजार टक्के वाढ
टोकयो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानंतर नीरजला मोठी प्रसिद्धी मिळत आहे. याबाबतच्या मीडिया रिपोर्टनुसार नीरजच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये एक हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे. नीरज चोप्राची एंडोर्समेंट फी आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) इतकी झाली आहे. ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याआधी 23 वर्षांच्या नीरजचं मानधन 15-25 लाख रुपये होतं, तर कोहली आणि धोनी 1 ते 5 कोटी रुपये घ्यायचे. आता या दोन्ही क्रिकेटपटूंपेक्षा नीरजला जास्त पैसे मिळू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
VIDEO: 'मेडल ले चुके सनम...', Ad वर्ल्ड मध्ये नीरज चोप्राची दमदार एन्ट्री!
नीरज चोप्राची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली असून त्याच्या जुन्या करारांमध्येही संशोधन केलं जाईल, असं जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सचे सीईओ मुस्तफा घोष यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. आमच्याकडे जवळपास 80 ब्रॅण्ड्सच्या ऑफर आहेत, तर नीरजकडे पुढच्या 12-14 महिन्यांमध्ये भारत आणि परदेशातल्या प्रशिक्षण शिबीराच्या मध्ये कमी वेळ आहे, त्यामुळे आम्हाला योग्य निवड करावी लागेल, असं घोष यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sports, Video viral