मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराट, धोनी की नीरज चोप्रा? वाचा 2021 मध्ये कुणाला करण्यात आले सर्वाधिक Search

विराट, धोनी की नीरज चोप्रा? वाचा 2021 मध्ये कुणाला करण्यात आले सर्वाधिक Search

2021 सालातील शेवटचा महिना आता सुरू झाला आहे. भारतीय क्रीडा विश्वासाठी हे वर्ष संमिश्र ठरलं. नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं गोल्ड ही भारतीय क्रीडा विश्वासाठी या वर्षातील सर्वात अभिमानाची गोष्ट ठरली.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 3 डिसेंबर:  2021 सालातील शेवटचा महिना आता सुरू झाला आहे. भारतीय क्रीडा विश्वासाठी हे वर्ष संमिश्र ठरलं. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी भारताने यंदा टोक्योमध्ये (Tokyo Olympics 2020) नोंदवली. नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) भालाफेक स्पर्धेत ऑलिम्पिक गोल्ड जिंकत इतिहास रचला. तर क्रिकेटमध्ये आयसीसीच्या दोन मोठ्या स्पर्धात भारतीय फॅन्सना निराशा सहन करावी लागली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) न्यूझीलंडनं टीम इंडियाचा पराभव केला. तर टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup 2021) सेमी फायनल गाठण्यात भारतीय क्रिकेट टीमला अपयश आले. आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) विजेतेपद पटकावले. या संपूर्ण वर्षात कोणत्या भारतीय खेळाडूबद्दल सर्वाधिक सर्च करण्यात आले याची माहिती याहूने जाहीर केली आहे.

भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहलीबद्दल यावर्षी सर्वात जास्त सर्च करण्यात आले. विराटच्या कॅप्टनसीमध्ये आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडिया अपयशी ठरली. मात्र इंग्लंडमधील टेस्ट सीरिजमध्ये आघाडी मिळवली होती. त्याचबरोबर विराटनं वर्कलोडचे कारण टी20 वर्ल्ड कपनंतर टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर त्यानं आरसीबीची कॅप्टनसी देखील आता सोडली आहे.

विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आहे. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेनं यंदा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तसंच तो टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा मेंटॉर देखील होता. त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठीही भारतीयांनी सर्च केले आहे.

IND vs SA: टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द होणार? वाचा मोठे UPDATE

ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्रा या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण त्यानं या यादीमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) मागे टाकले आहे. सचिन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं पाचवा क्रमांक पटकावला आहे. रोहितच्या मुंबई इंडियन्सला यावर्षीच्या आयपीएलमध्ये 'प्ले ऑफ' गाठण्यात अपयश आले. पण, तो आता टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन बनला आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला.

First published:

Tags: MS Dhoni, Rohit sharma, Sports, Virat kohli