Home /News /sport /

खडतर आव्हानांचा सामना करत काश्मिरमध्ये उभी राहिली महिला फूटबॉल टीम

खडतर आव्हानांचा सामना करत काश्मिरमध्ये उभी राहिली महिला फूटबॉल टीम

जम्मू-काश्मीरमध्ये काहीच दिवसांपूर्वी तयार झालेली महिलांची फूटबॉल टीम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रियल काश्मिर फूटबॉल क्लब (Real Kashmir FC) ला आयलीगमध्ये मिळालेल्या यशानंतर तिथल्या महिलांमध्येही फूटबॉल खेळाबद्दलचं आकर्षण वाढायला लागलं.

पुढे वाचा ...
    श्रीनगर, 19 नोव्हेंबर : अस्थिर आयुष्य आणि अस्पष्ट भविष्याच्या सावटाखाली जगणारं काश्मिर हळूहळू उभं राहू लागलं आहे. इथल्या तरुणींच्या डोळ्यांमध्ये घराबाहेर पडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाची स्वप्नं फेर धरून नाचू लागली आहेत. ही स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी रियल काश्मिर फूटबॉल क्लब त्यांच्या बरोबरीने मैदानात उतरला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काहीच दिवसांपूर्वी तयार झालेली महिलांची फूटबॉल टीम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रियल काश्मिर फूटबॉल क्लब (Real Kashmir FC) ला आयलीगमध्ये मिळालेल्या यशानंतर तिथल्या महिलांमध्येही फूटबॉल खेळाबद्दलचं आकर्षण वाढायला लागलं, त्यामुळेच महिलांची फूटबॉल टीम तयार करण्यात आली आहे. खोऱ्यातल्या महिलांची फूटबॉल खेळण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी रियल काश्मिर फूटबॉल क्लबने #ShePower मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत काश्मिरमधल्या महिला खेळाडूंमध्ये असलेलं फूटबॉलचं कौशल्य आणखी निपूण करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे दोन महिन्यांपूर्वी काश्मिरला फूटबॉलची पहिली महिला टीम मिळाली. या क्लबमधल्या सगळ्या तरुणी राष्ट्रीय स्तरावर छाप पाडण्यासाठी आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक मेहनत घेताना दिसत आहेत. 'खेळण्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळत आहे. मुलींनाही फूटबॉल खेळला पाहिजे, कारण त्याही मुलांप्रमाणेच हा खेळ खेळू शकतात', अशी प्रतिक्रिया क्लबची फूटबॉलपटू आयशा युनूसने दिली. 'फूटबॉल खेळण्यासाठी बऱ्याच मुली पुढे येत आहेत. या मुलींमध्ये प्रतिभाही खूप आहे, पण त्यांना संधी मिळत नव्हती. आता त्यांना संधी मिळत असल्यामुळे त्या चांगली कामगिरी करतील आणि त्यांचे पालक, क्लब आणि जम्मू-काश्मिरचं नाव आणखी मोठं करतील', असा विश्वास रियल काश्मिर एफसीच्या प्रशिक्षक नादिया निघाट यांनी व्यक्त केला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या