मुंबई, 25 नोव्हेंबर : अर्जेंटिनाचे महान फूटबॉलपटू डियागो मॅरडोना (Diego Maradona) यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1986 सालच्या वर्ल्ड कपमध्ये मॅरडोना यांनी अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला. याच वर्ल्ड कपमधल्या इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये मॅरडोना यांनी केलेला गोल हॅण्ड ऑफ गॉड नावाने प्रसिद्ध झाला. याच विजयामुळे इंग्लंडचं वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आलं. 21 वर्ष मॅरडोना यांनी अर्जेंटिनाचं प्रतिनिधीत्व केलं.
मॅरडोना यांची कारकिर्द
1 वयाच्या 15 व्या वर्षी मॅरडोना यांनी व्यावसायिक फूटबॉल खेळायला सुरुवात केली.
2 1976 साली अर्जेंटिना ज्युनियर्सकडून मॅरडोना पहिला सामना खेळले
3 मॅरडोना यांच्या खांद्यावर चे गवेरा यांचा टॅटू होता.
4 मॅरडोना यांच्या डाव्या पायावर फिडेल कॅस्ट्रो यांचाही टॅटू होता.
5 2005 साली मॅरडोना यांनी अर्जेंटिनाच्या टीव्हीवर टॉक शो घ्यायला सुरुवात केली.
6 मॅरडोना यांच्या पहिल्याच शोमध्ये त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी असूनही पेले यांना पाव्हणे म्हणून बोलावलं
7 अर्जेंटिना ज्युनियरने मॅरडोना यांचं नाव स्टेडियमला दिलं.
8 एस्टिडो डियागो आरमांडो मॅरडोना असं या स्टेयिमचं नामकरण करण्यात आलं.
9 ब्युनोस एयर्समध्ये 1998 साली चाहत्यांनी मॅरडोना यांचं चर्च सुरू केलं.
10 30 ऑक्टोबर हा त्यांचा वाढदिवस इसविसन पूर्व आणि इसविसन उत्तर अशाप्रकारे साजरा केला जायचा. ऑक्टोबर 2010 साली त्यांचा वाढदिवस 50 D.D (Despues de Diego) म्हणजेच आफ्टर डियागो म्हणून साजरा केला गेला.
11 ब्राझीलमध्ये जन्मलेल्या डियागो कोस्टा याचं नावही मॅरडोना यांच्या नावावरून देण्यात आलं.
12 अर्जेंटिना आणि ब्राझील यांच्यात कट्टर प्रतिस्पर्धा असतानाही कोस्टाचं नाव डियागो ठेवण्यात आलं.
13 अर्जेंटिनासाठी मॅरडोना यांनी चार वर्ल्ड कप खेळले.
14 वर्ल्ड कपमध्ये मॅरडोना यांनी 21 सामने खेळले.
15 अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी मॅरडोना यांची 10 नंबरची जर्सीही त्यांच्या निवृत्तीसोबत निवृत्त करण्याची आग्रही मागणी केली.
16 फिफाने मात्र 10 नंबरची जर्सी निवृत्त करून मॅरडोना यांचा सन्मान करायला नकार दिला.
17 मॅरडोना यांनी 2006 साली जर्मनीत झालेल्या वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीला जायला नकार दिला.
18 पेले यांना समोर चालताना बघण्यासाठी मी इथे आलो नाही, अशी प्रतिक्रिया मॅरडोना यांनी दिली होती.
19 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक फाऊल करण्याचा विक्रमही मॅरडोना यांच्या नावावर आहे.
20 1986 सालच्या मॅक्सिकोमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये मॅरडोना यांनी 53 फाऊल केले.