FIFA वर्ल्डकप प्रेमींसाठी आज सुपर संडे ,एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या लढती

FIFA वर्ल्डकप प्रेमींसाठी आज सुपर संडे ,एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या लढती

२०१४च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या जर्मनीचा संघ सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचे लक्ष्य समोर ठेवून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

  • Share this:

रशिया, 17 जून : FIFA वर्ल्डकप प्रेमींसाठी आज सुपर संडे आहे. कारण आज एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या लढती असणार आहेत.

पहिला सामना संध्याकाळी 5.30 वाजता - कोस्टारिका विरुद्ध सर्बिया

दुसरा सामना रात्री 8.30 वाजता - जर्मनी विरुद्ध मेक्सिको

तिसरी लढत रात्री 11.30 वाजता - ब्राझील विरूद्ध स्वित्झलँड

२०१४च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या जर्मनीचा संघ सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचे लक्ष्य समोर ठेवून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. आज त्यांच्यासमोर मेक्सिकोचे आव्हान असणार आहे. शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या गोलरक्षक मॅन्युएल नॉयरची तंदुरुस्ती, प्रशिक्षक जोआकिम लो यांचे यशस्वी मार्गदर्शन आणि अनुभवी तसेच युवा खेळाडूंची योग्य सांगड या गोष्टींचा मेळ जर्मनी एकत्र साधणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

हेही वाचा

FIFA WORLD CUP 2018 : फ्रान्सची आॅस्ट्रेलियावर 2-1नं मात

तीन महिन्यांपूर्वी नेयमारच्या दुखापतीमुळे संपूर्ण ब्राझीलवर शोकांतिका पसरली होती. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील त्याच्या सहभागाविषयी अनेक तर्क लावण्यात आले. मात्र नेयमारने सराव सामन्यांत गोलचा पाऊस पाडून जोरदार पुनरागमनाचे संकेत दिले. त्यामुळे ब्राझीलच्या विश्वचषक मोहिमेला बळकटी मिळाली आहे. आज माजी विजेत्यांना स्वित्झलँडसारख्या लढाऊ संघाशी सामना करावा लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2018 01:28 PM IST

ताज्या बातम्या