मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

F1 World Title: लुईस हेमिल्टन शेवटच्या क्षणी पराभूत झाल्यानं सचिन निराश, म्हणाला...

F1 World Title: लुईस हेमिल्टन शेवटच्या क्षणी पराभूत झाल्यानं सचिन निराश, म्हणाला...

7 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणाऱ्या लुईस हेमिल्टनचा (Lewis Hamilton) थरारक लढतील पराभव झाला. हेमिल्टन पराभूत झाल्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) निराश झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 डिसेंबर : यूएईतील अबूधाबीमध्ये रविवारी फॉर्म्युला वन स्पर्धेतील (Formula1) स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात थरारक लढत झाली. या लढतीत रेडबूलच्या मॅक्स वेरस्टाप्पेन (Max Verstappen) याने अगदी शेवटच्या क्षणी खळबळजनक विजयाची नोंदी कली. त्याने 7 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणाऱ्या लुईस हेमिल्टनचा (Lewis Hamilton) पराभव केला. हेमिल्टन पराभूत झाल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नाराज झाला आहे.

सचिननं ट्विट करत या मॅचवर प्रतिक्रिया दिली आहे. 'काय जबरदस्त रेस होती.पहिल्यांचा वर्ल्ड चॅम्पियन होणाऱ्या मॅक्सचं अभिनंदन. तो पुढे आणखीही यशस्वी होईल. पण, मला लुईससाठी वाईट वाटत आहे. सेफ्टी कार नसती तर ही ट्रॉफी त्याची होती. अतिशय दुर्दैवी. पुढील सिझनसाठी त्याला शुभेच्छा.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने क्रिकेटच्या भाषेत हा निकाल समजावून सांगितला आहे. 1 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 6 रन हवे आहेत. आणि गेस करा काय झालं... मॅक्स वेरस्टापेननं सिक्स लगावला. अविश्वसनीय विजय' असं ट्विट रोहितनं केलं आहे.

मॅक्स वेरस्टाप्पेन हा वर्ल्ड चॅम्पियन होणारा पहिला डच ड्रायव्हर बनला आहे. तसंच त्याच्या रेडबूल टीमने 2013 नंतर पहिल्यांदा एफवन स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे.

कॅप्टनपदावरून हटवल्यानं विराट कोहली नाराज! 'या' कारणामुळे चर्चा तर होणारच...

First published:

Tags: Rohit sharma, Sachin tendulkar, Sports