Home /News /sport /

Inside Story: टीम इंडियाचा घाम काढणाऱ्या आयर्लंड क्रिकेट टीमला शापोरजी पालनोनजी यांनी दिली होती संजीवनी

Inside Story: टीम इंडियाचा घाम काढणाऱ्या आयर्लंड क्रिकेट टीमला शापोरजी पालनोनजी यांनी दिली होती संजीवनी

क्रिकेट विश्वातील अंडरडॉग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयर्लंड क्रिकेट टीमला (Ireland Cricket Team) घडवण्यात उद्योजक शापोरजी पालोनजी (Shapoorji Pallonji) यांचे मोठे योगदान होते.

    मुंबई, 29 जून : भारत विरूद्ध आयर्लंड (India vs Ireland) यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा घाम निघाला. टीम इंडियानं दिलेलं 226 रनचं लक्ष्य पूर्ण करण्यात आयर्लंडला फक्त 4 रन कमी पडले. त्यामुळे भारतीय टीमची मोठी नामुश्की टळली. आयर्लंड टीमनं यापूर्वीही क्रिकेटमध्ये धक्कादायक निकालांची नोंद केली आहे. क्रिकेट विश्वातील अंडरडॉग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयर्लंड क्रिकेट टीमला घडवण्यात उद्योजक शापोरजी पालोनजी यांचे मोठे योगदान होते. शापोरजी पालोनजी (Shapoorji Pallonji) यांचे वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. भारतात जन्म झाला असला, तरी सुमारे 15 वर्षांपूर्वी त्यांनी आयर्लंड देशाचं नागरिकत्व स्वीकारलं होतं. आयर्लंडमधील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत त्यांचं नाव होतं. या देशात त्यांनी केलेल्या कामांची यादी ही भरपूर मोठी आहे. आयर्लंड क्रिकेटला (Ireland Cricket and Pallonji) नवसंजीवनी देण्यातही त्यांचा वाटा आहे. कोण होते शापोरजी पालोनजी? भारतातील एका पारशी कुटुंबामध्ये पालोनजी यांचा जन्म झाला होता. त्यांचं पूर्ण नाव शापोरजी पालोनजी मिस्त्री (Shapoorji Pallonji Mistry) होतं. पालोनजी यांच्या पत्नी पेस्टी पेरीन या मूळ आयर्लंडच्या होत्या. इंग्लंडमध्ये कॉलेज शिक्षण घेत असताना या दोघांची ओळख झाली होती. लग्नानंतर पालोनजी यांनाही तेथील नागरिकत्व मिळालं. नागरिकत्व मिळण्याच्या आधीपासूनच ते आयर्लंडमध्ये राहत होते. असं असलं, तरी आपल्या व्यापाराच्या कामासाठी त्यांचे मुंबई दौरे सुरू होते. गेल्या काही महिन्यांपासून ते मुंबईतच होते. काही वर्षांपूर्वी भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. पालोनजी यांचं कुटूंब पालोनजी यांच्या पश्चात दोन मुलं आणि दोन मुली आहेत. त्यांच्या दोन मुलांपैकी एक सायरस मिस्त्री यांनी टाटा ग्रुपचे चेअरमन म्हणून काम केलं आहे. तर, शापोर मिस्त्री हे एसपी ग्रुपचे कामकाज पाहतात. दोन मुलींपैकी एकीचं लग्न टाटा ग्रुपचे नोएल टाटा यांच्याशी झालं आहे. जगभरात व्यापाराचा विस्तार पालोनजी यांचा व्यापार (Shapoorji Pallonji business) जगभरात पसरलेला आहे. भारतात त्यांचा सर्वाधिक व्यापार आहे. मुंबईच्या मलबार हिल्स परिसरात त्यांचा एक मोठा बंगला आहे. तसंच, पुण्यात एक 200 एकर परिसरातील फार्महाऊसही त्यांच्या मालकीचं आहे. या ठिकाणी त्यांनी भरपूर घोडे पाळले आहेत. या व्यतिरिक्त त्यांचा पुणे शहरात एक मोठा बंगला आहे, तसंच अन्य अनेक प्रॉपर्टीज त्यांच्या नावावर आहेत. 18.7 बिलियन डॉलर्स संपत्ती फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार 2017 साली पालोनजी यांच्याकडे सुमारे 18.7 बिलियन डॉलर्सची संपत्ती (Shapoorji Pallonji wealth) होती. टाटा ग्रुपमध्ये त्यांचा सर्वाधिक (18.4 टक्के) शेअर आहे. यासोबतच ते भारतातील सर्वांत मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी शापोरजी पालोनजी ग्रुपचे माजी चेअरमन होते. इंग्लंडला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या इयन मॉर्गनचा राजीनामा वडिलोपार्जित व्यवसाय पुढे चालवला पालोनजी यांच्या आजोबांनी सुमारे 140 वर्षांपूर्वी एका ब्रिटिश व्यक्तीसोबत मिळून बांधकाम कंपनीची स्थापना केली होती. लिटिलवुड्स पालोनजी असं या कंपनीचं नाव होतं. मुंबईतील फोर्ट परिसरात कित्येक ऐतिहासिक इमारती आणि हॉटेल त्यांनी उभारली. असं म्हणतात, की मुंबईतील कित्येक मोठ्या इमारती (Man who built half Mumbai) याच कंपनीने बांधल्या आहेत. पालोनजी यांच्या कंपनीने ओमान देशाच्या सुल्तानाचा महालही बांधला आहे. 1921 साली पालोनजी यांच्या आजोबांचे निधन झाले, त्यानंतर कंपनीची जबाबदारी पालोनजी यांच्या वडिलांवर पडली. त्यांनीदेखील ही कंपनी पुढे नेली. 1975 साली त्यांचे निधन झाल्यानंतर पालोनजी यांनी कंपनीची धुरा सांभाळली. पालोनजी यांनी आपल्या नेतृत्त्वात कंपनी खूप पुढे नेली. त्यांनी टाटा ग्रुपमध्ये मोठी गुंतवणूक केली. तसंच, इतर काही कंपन्यांची (Companies owned by Pallonji group) स्थापनाही केली. एफकांस इन्फ्रास्ट्रक्चर, एसपीसीएल, एसपी इंटरनॅशनल, स्टर्लिंग अँड विल्सन आणि एसपी रिअल इस्टेट या कंपन्या त्यांनी उभारल्या. या कंपन्यांचा वार्षिक रेव्हेन्यू तब्बल चार बिलियन डॉलर्स एवढा आहे. याव्यतिरिक्त गोकाक टेक्सटाईल आणि युरेका फोर्ब्स पालोनजी या कंपन्याही पालोनजी ग्रुपच्याच आहेत. फँटम म्हणून ओळख पालोनजी यांचं शिक्षण लंडनमध्ये झालं होतं. त्यांना व्हिस्की आणि घोडे या दोन गोष्टींची प्रचंड आवड होती. त्यांना घोड्यांच्या शर्यतीत पैसे लावायला खूप आवडत. आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाला त्यांनी वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं. ते आपल्या पुण्यातील फार्महाऊसवर किंवा आयर्लंडला असत. त्यांच्यासोबत काम केलेले लोक सांगतात, की ते सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत. त्यांच्याकडे गेलं की प्रत्येक समस्येवर तोडगा मिळत असे. त्यांच्या बोल्ड आणि स्ट्रेटफॉरवर्ड स्वभावामुळे लोक त्यांना फँटम म्हणत (Pallonji known as Phantom) असत. आयर्लंड क्रिकेटला दिली नवसंजीवनी पालोनजी यांचा आयर्लंडमध्ये व्यापार नव्हता. मात्र, तिथे लोकोपयोगी कामांसाठी त्यांनी भरपूर पैसे दान केले होते. यामुळेच आयर्लंडचे लोक त्यांना खूप मानत होते. याव्यतिरिक्त गेल्या दीड दशकांपासून ते आयर्लंड क्रिकेटला आर्थिक प्रोत्साहन देत होते. चार वर्षांपूर्वीच त्यांनी आयर्लंड क्रिकेटसोबत कित्येक कोटी युरोंचा करार केला आहे. हा करार 10 वर्षांसाठी असणार आहे. आज आयर्लंडची टीम (Pallonji contribution to Ireland Cricket) जिथे पोहोचली आहे, त्याचं सर्व श्रेय पालोनजी यांनाच जातं, असं आयर्लंडचे सर्व क्रिकेटपटू सांगतात. यामुळेच मागे वर्ल्ड कपमध्ये जेव्हा आयर्लंडची टीम मैदानात उतरली होती, तेव्हा प्रेक्षक पालोनजी यांना धन्यवाद देणारे बॅनर घेऊन उभे असलेले दिसले होते.
    First published:

    Tags: Cricket, Team india

    पुढील बातम्या