मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

CWG 2022: बायकोला गोल्ड तर भावाला सिल्व्हर! क्रिकेटपटूच्या घरी पदकांची लयलूट

CWG 2022: बायकोला गोल्ड तर भावाला सिल्व्हर! क्रिकेटपटूच्या घरी पदकांची लयलूट

ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत (CWG2022) ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या पत्नीनं गोल्ड तर भावानं सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे.

ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत (CWG2022) ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या पत्नीनं गोल्ड तर भावानं सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे.

ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत (CWG2022) ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या पत्नीनं गोल्ड तर भावानं सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे.

    मुंबई, 8 ऑगस्ट : ब्रिटनमधील बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्सचा (Commonwealth Games 2022) आज (8 ऑगस्ट 2022) शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी आपल्या पदकांची संख्या वाढवण्याचा प्रत्येक देशाच्या खेळाडूंचा प्रयत्न असेल. या स्पर्धेमध्ये रोज नवनवे विक्रम होत आहेत. अनेक इंटरेस्टिंग गोष्टी या स्पर्धेत घडत आहेत. या स्पर्धेत पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा (Women’s Cricket) समावेश करण्यात आला. यामध्ये ऑस्ट्रेलियनं टीमनं गोल्ड मेडल पटकावलं. ऑस्ट्रेलियानं फायनलमध्ये टीम इंडियाचा 9 रननं पराभव केला. गोल्ड मेडल विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या टीमची एलिसा हिली (Alyssa Healy) ही प्रमुख खेळाडू होती. एलिसा ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कची (Austrailia Fast Bowler Michel Stark) पत्नी आहे, तर स्टार्कचा लहान भाऊ ब्रेंडन मार्कही (Brendan Mark) या स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यानं अ‍ॅथलेटिक्समध्ये सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे. म्हणजेच स्टार्कच्या बायको आणि भावानं या स्पर्धेत मेडलची कमाई केली आहे. 28 वर्षांच्या ब्रँडन स्टार्कनं उंच उडी म्हणजे हाय जंपमध्ये (High Jump) सिल्व्हर मेडलवर नाव कोरलं. ब्रँडननं उंच उडी म्हणजे हाय जंपमध्ये 2.25 मीटर अंतर नोंदवून सिल्व्हर मेडल मिळवलं. याच स्पर्धेत भारताच्या तेजस्विन शंकरनं 2.22मीटर जंप करून ब्राँझ मेडल मिळवलं. या पूर्वी 2018 च्या गोल्ड कोस्ट गेम्समध्ये स्टार्कनं गोल्ड मेडल मिळवलं होतं. 2010 च्या यूथ ऑलिम्पिक स्पर्धेमधून ब्रँडनने इंटरनॅशनल करिअरची सुरुवात केली होती. पदार्पणाच्या त्या स्पर्धेत त्यानं सिल्व्हर मेडल मिळवलं होतं. CWG 2022 : टीम इंडिया पुन्हा ठरली चोकर्स, 4 प्रमुख कारणांमुळे हुकलं गोल्ड मेडल ऑस्ट्रेलियाच्या महिला टीमनं क्रिकेटमध्ये गोल्ड मेडल मिळवलं असलं तरी या स्पर्धेत एलिसा हिलीला सूर गवसला नाही.  पहिल्या मॅचमध्ये भारताविरुद्ध ती खातंही उघडू शकली नाही. ग्रुप राउंडच्या शेवटच्या दोन मॅचेसमध्ये बार्बाडोसविरुद्ध तिनं नाबाद 23 रन्स केले तर पाकिस्तान विरुद्ध केवळ 4 रन्सच केले. सेमीफायनलमध्येही ती रन करू शकली नाही. न्यूझीलंडविरुद्ध ती 14 रन्स करून आऊट झाली. तर फायनल्समध्ये एलिसानं फक्त 7 रन्स केले. या स्पर्धेत अपयशी ठरली असली तरी  एलिसा हिलीची टी- 20 क्रिकेटमधील कारकिर्द दमदार आहे.  तिनं 132 मॅचेसमध्ये 23 च्या सरासरीनं 2207 रन्स केले आहेत. एक सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरीही केली आहे. नाबाद 148 रन्सही तिच्या नावावर आहेत. कॉमनवेल्थ गेम्सच्या आधी 2020 च्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप फायनलमध्येही ऑस्ट्रेलियाच्या टीमनं भारतीय महिला टीमचा पराभव केला होता.
    First published:

    Tags: Australia, Sports

    पुढील बातम्या