मुंबई, 31 डिसेंबर : क्रिकेट चाहत्यांसाठी 2019 हे वर्ष अनेक रोमांचक प्रसंगांमुळे खास राहिले. 2019मध्येच एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये पार पडला. यात यजमान इंग्लंडने सुपर ओव्हरच्या जोरावर वर्ल्ड कपचा किताब जिंकला. यात अनेक वादही झाले. मात्र या वर्ल्ड कपने अनेक विक्रम प्रस्थापित केले. यात भारतीय चाहत्यांनी मैदानात सर्वात जास्त संख्येने उपस्थिती लावली. त्यामुळं आता 2020 हे 2019पेक्षा भारतीय चाहत्यांसाठी जास्त खास असणार आहे.
नव्या वर्षात भारतीय क्रिकेट चाहत्यांनी पर्वणी असणार आहे. कारण 5 जानेवारीपासून भारतीय संघ टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर लगेगच ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका होईल. मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे ते टी-20 वर्ल्ड कपकडे. 2020मध्ये ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.
वाचा-ठरलं! ‘या’ तारखेपासून सुरू होणार IPLचा धमाका, मुंबईत पडणार चौकार-षटकारांचा पाऊस
मात्र मुख्य म्हणजे क्रिकेट चाहत्यांना एक नाही तर तीन-तीन वर्ल्ड कप पाहण्याची संधी मिळणार आहे. 2020मध्ये ICC अंडर 19 वर्ल्ड कप, ICC महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप आणि ICC पुरुष टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय 24 जुलै ते 9 ऑगस्ट 2020पर्यंत टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. यात पहिला वर्ल्ड कप अंडर-19 संघांचा होणार आहे.
वाचा-भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूवर बंदीअंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप
19 जानेवारी- भारत vs श्रीलंका
21 जानेवारी- भारत vs जपान
24 जानेवारी- भारत vs न्यूझीलंड
फायनल- 9 फेब्रुवारी
त्यानंतर महिला संघांचे टी-20 सामने होतील. महिला टी-20 वर्ल्ड कपची सुरुवात 21 फेब्रुवारीपासून होणार आहे. यातील पहिलाच सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्याविरुद्ध होईल.
महिला टी-20 वर्ल्ड कप असे असतील
21 फेब्रुवारी- भारत vs ऑस्ट्रेलिया (सिडनी)
24 फेब्रुवारी- भारत vs बांगलादेश (पर्थ)
27 फेब्रुवारी-भारत vs न्यूझीलंड (मेलबर्न)
29 फेब्रुवारी- भारत vs श्रीलंका (मेलबर्न)
5 मार्च- सेमीफायनल
8 मार्च- फायनल
पुरुष T20 World Cup 2020 ही स्पर्धा पाच आठवडे चालणारी ही स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020पर्यंत खेळली जाणार आहे.
वाचा-ICC कसोटी क्रिकेटमध्ये आणणार नवा ट्विस्ट, बदलणार 142 वर्षांपूर्वीचा नियमअसे असतील भारताचे सामने
ऑक्टोबर 24-भारत vs दक्षिण अफ्रीका (पर्थ स्टेडियम)
ऑक्टोबर 29- भारत vs क्वालिफायर ए-2 (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
नोव्हेंबर 1- भारत vs इंग्लंड (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
नोव्हेंबर 5 - भारत vs क्वालिफायर बी-1 (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर 8- भारत vs अफगाणिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
सेमीफायनल
नोव्हेंबर 11 – पहिली सेमीफायनल (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
नोव्हेंबर 12 – दुसरी सेमीफाइनल (एडिलेड ओव्हल)
फायनल
नोव्हेंबर 15 – फायनल (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
वाचा-…आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणाला ‘जय श्रीराम’, VIDEO VIRALया संघांनी वर्ल्ड कप केला आहे नावावर
आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचे हे सातवे वर्ष आहे. आतापर्यंत भारत (2007), पाकिस्तान (2009), इंग्लंड (2010), श्रीलंका (2014) आणि वेस्ट इंडिज (2012, 2016) यांनी विजेतेपद मिळवले आहे. पुढच्या वर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे. 15 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये अंतिम सामना होणार आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.