मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

आलिया भट्टच्या मंगळसूत्रपासून ते मेहंदीपर्यंत सर्व गोष्टींमध्ये दडलंय खास चिन्ह, काय आहे त्याचा नेमका अर्थ?

आलिया भट्टच्या मंगळसूत्रपासून ते मेहंदीपर्यंत सर्व गोष्टींमध्ये दडलंय खास चिन्ह, काय आहे त्याचा नेमका अर्थ?

 अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांचा विवाह सोहळा (Ranbir-Alia wedding) गुरुवारी (14 एप्रिल 22) झाला. या दोघांच्या लग्नाचे फोटो (Ranbir Alia wedding pictures) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नामधील आलियाचा लुक (Alia Bhatt wedding look) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यापेक्षाही जास्त चर्चा तिच्या दागिन्यांची आणि त्यामध्ये दडलेल्या खास संदेशाची होत आहे.

पुढे वाचा ...

 मुंबई, 15 एप्रिल- अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांचा विवाह सोहळा (Ranbir-Alia wedding) गुरुवारी (14 एप्रिल 22) झाला. या दोघांच्या लग्नाचे फोटो (Ranbir Alia wedding pictures) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नामधील आलियाचा लुक (Alia Bhatt wedding look) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यापेक्षाही जास्त चर्चा तिच्या दागिन्यांची आणि त्यामध्ये दडलेल्या खास संदेशाची होत आहे. आलियाचं मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्यांचा चुडा आणि मेंदीमध्येही इंग्रजीतील 8 अंकाप्रमाणे असलेले चिन्ह (Infinity symbol in Alia’s jewellery) दिसून आलं.

इन्फिनिटी प्रॉमिस!

आपल्याला माहिती आहे, की इंग्रजीतील 8 अंक हा इन्फिनिटी (Infinity symbol) चिन्हाशी मिळताजुळता आहे. एखाद्या जोडप्यासाठी हे चिन्ह अधिक महत्वाचं आहे. कारण हे चिन्ह त्या दोघांच्या कायम सोबत राहण्याच्या निर्धाराचं प्रतीक ठरतं. आलियाच्या जवळपास सर्व दागिन्यांमध्ये आणि मेंदीमध्येही (Alia Bhatt Mehendi) हे चिन्ह दिसून आल्याने तिच्या दागिन्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

आलियाच्या मंगळसूत्रात (Alia Bhatt Mangalsutra) काळे मणी आणि सोन्याच्या चेनपासून हे चिन्ह साकार झालं होतं. तर तिच्या गळ्यात एक टिअरड्रॉप डायमंड पेंडंटही (Alia Bhatt Jewellery) होतं. या पेंडंटच्या वरच्या भागात इन्फिनिटी चिन्ह होतं. यासोबतच आलियाच्या बांगड्यांच्या चुड्यामध्येही इन्फिनिटी चिन्ह स्पष्टपणे (Alia Bhatt Kaleere) दिसून येत होतं. शिवाय तिचा चुडा हा पारंपरिक पद्धतीचा नसून, कस्टमाईज्ड (Customised Kaleere) होता. तिने त्यामध्ये फुलपाखरू, ढग, चंद्र आणि ताऱ्यांचं डिझाईन तयार करून घेतलं होतं.

मेंदीमध्येही इन्फिनिटी सिम्बॉल

केवळ आलियाच्या ज्वेलरीमध्येच नाही, तर तिच्या मेंदीमध्येही रणबीरला दिलेल्या इन्फिनिटी प्रॉमिसचं प्रतीक दिसून आलं. आलियाच्या हातावरील मेंदीच्या (Alia Bhatt Mehendi) एका क्लोजअप शॉटमध्ये हे स्पष्टपणे दिसून आलं. तिच्या उजव्या हाताच्या तळव्यावर हे चिन्ह काढण्यात आलं होतं.

आलियाची अंगठीही चर्चेत

इन्फिनिटी सिम्बॉल असलेल्या दागिन्यांव्यतिरिक्त आलियाची अंगठीही (Alia Bhatt wedding ring) सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. एका फोटोमध्ये आलिया आणि रणबीर वेडिंग केक कापताना दिसत आहेत. या फोटोत तिची डायमंड सॉलिटेअर अंगठी दिसत आहे.

यासोबतच, आलियाच्या साडीवरही सोन्याची एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. प्रसिद्ध फॅशन डिझायनिंग कंपनी सब्यसाची क्रिएशन्सने (Sabyasachi creations) ही साडी डिझाईन केली होती. यासोबतच आलियाने सब्यसाची हेरिटेज ज्वेलरी कंपनीचे दागिने घातले होते. आलियाच्या प्रत्येक दागिन्यामध्ये अनकट डायमंड्स (Uncut diamonds) आणि हँड-स्ट्रंग पर्ल्सचा (Hand-strung pearls) समावेश होता. तिने घातलेले चोकर, झुमके आणि बांगड्याही फॅन्सच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. तिची हेअरस्टाईलही तिच्या हेडबँडला साजेशी - हाफ डाऊन, हाफ अप अशी करण्यात आली होती.

गुरुवारी विवाह झाल्यानंतर आलियाने इन्स्टाग्रामवर (Alia Bhatt Instagram) लग्नाचे फोटो पोस्ट केले होते. ‘या घरातील आमच्या फेव्हरेट स्पॉटवर, कुटुंबीयांच्या आणि मित्रांच्या उपस्थितीत आम्ही लग्नबंधनात अडकलो!’ अशा आशयाचं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं होतं. यासोबतच तिने शुभेच्छांसाठी सर्व मित्रांचे आणि फॅन्सचे आभारही मानले.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor