मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

एकापाठोपाठ एक फ्लॉप देणाऱ्या शाहिदसाठी 'लेडी लक' ठरली पत्नी मीरा, आयुष्यात येताच अशी बदलली 'कबीर' ची लाईफ

एकापाठोपाठ एक फ्लॉप देणाऱ्या शाहिदसाठी 'लेडी लक' ठरली पत्नी मीरा, आयुष्यात येताच अशी बदलली 'कबीर' ची लाईफ

करिअरच्या सुरुवातीला शाहिद कपूरने अनेक रोमँटिक चित्रपट केले. चॉकलेट बॉयच्या क्यूट लुकने त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले.

करिअरच्या सुरुवातीला शाहिद कपूरने अनेक रोमँटिक चित्रपट केले. चॉकलेट बॉयच्या क्यूट लुकने त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले.

करिअरच्या सुरुवातीला शाहिद कपूरने अनेक रोमँटिक चित्रपट केले. चॉकलेट बॉयच्या क्यूट लुकने त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले.

 मुंबई, 25 फेब्रुवारी-   शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा बॉलीवूडमधील ( Bollywood ) सर्वांत हँडसम हंक कलाकारांपैकी ( handsome hunk actors ) एक आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने तो किती अष्टपैलू ( versatile ) अभिनेता आहे, हे सिद्ध केलंय. आज त्याचा 41 वा वाढदिवस (Shahid Kapoor Birthday) आहे. शाहिदचं फॅन फॉलोइंग खूप मोठं आहे. बॅकग्राउंड डान्सर( background dancer ) म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या शाहिदचा बॉलिवूडमधील प्रवास चांगला राहिला. 20 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने बॉलिवूडमध्ये चांगले-वाईट असे जवळपास सर्व प्रकारचे अनुभव घेतलेत.

अनेक चित्रपट झाले सुपरहिट-

करिअरच्या सुरुवातीला शाहिद कपूरने अनेक रोमँटिक चित्रपट केले. चॉकलेट बॉयच्या क्यूट लूकने त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले. अनेक मुलींचा शाहिद क्रश होता. 'इश्क विश्क' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर 'विवाह', 'जब वुई मेट', 'कबीर सिंह'सह अनेक रोमँटिक चित्रपट केले. चित्रपटाचे दिग्दर्शक केन घोष यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'मला इश्क विश्कचं शूट करताना माहीत नव्हतं की, शाहिद हा पंकज कपूरांचा मुलगा आहे. रोमान्स जॉनरमध्ये त्याने अप्रतिम काम केलंय.'

करिअरमध्ये चढ-उतार-

शाहिदच्या टॅलेंटचं आणि त्याच्या मेहनतीचं नेहमीच कौतुक होत आलंय. पण, त्याच्या करिअरचा आलेख नेहमीच एकसारखा राहिला नाही. अनेक फ्लॉपनंतरही त्याने हिट चित्रपट दिले, आणि जबरदस्त कमबॅक केलं. ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'शाहिद कपूरने त्याच्या करिअरमध्ये अनेक फ्लॉप चित्रपट केले आहेत, पण त्याची चांगली गोष्ट म्हणजे त्याने नेहमीच एका चांगल्या चित्रपटासह कमबॅक केलंय.'मध्यंतरी शाहिद कपूरचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. परंतु लग्नानंतर शाहिद कपूरच्या करिअरमध्ये टर्निंग पॉईंट आल्याचं दिसून आलं. लग्नानंतर त्याचे अनेक चित्रपट हिट झाले. त्यामुळे अनेकजण मीराला त्याची लेडी लक म्हणतात.

विविध भूमिकांनी जिंकली प्रेक्षकांची मनं-

शाहिद बॉलीवूडच्या अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्यांनी त्यांच्या चित्रपट आणि भूमिकांमध्ये सतत प्रयोग केलेत. 'कमिने'मध्ये डबल रोल साकारण्यापासून ते 'हैदर'मध्ये एका काश्मिरी मुलाची भूमिका त्याने उत्कृष्ट साकारली होती. त्याने 'उडता पंजाब'मध्ये केलेल्या ड्रग अॅडिक्ट रॉकस्टार आणि 'पद्मावत'मध्ये केलेल्या राजपूत राजकुमाराच्या भूमिकेने लोकांची मनं जिंकली.

कबीर सिंगसोबत नवीन सुरुवात-

'कबीरसिंग' हा चित्रपट शाहिद कपूरसाठी मैलाचा दगड ठरला. त्याने या चित्रपटात त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अभिनय केलाय. या चित्रपटातून त्याच्या करिअरला मोठी चालना मिळाली. आता तो 'जर्सी' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. कबीरसिंग चित्रपटातील त्याच्या भूमिकेचा त्याला त्याच्या आगामी चित्रपटांमध्येही फायदा मिळू शकतो.

स्वतःच्या अभिनयाच्या बळावर अनेकांच्या मनात घर करणाऱ्या चॉकलेट बॉय शाहिद कपूरचा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात त्याचे फॅन शुभेच्छा देत आहेत. आमच्याकडूनही त्याला शुभेच्छा.

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment, Shahid kapoor