सेरेना विल्यम्सकडून 'बेबीगर्ल्स'चा पहिला फोटो 'पोस्ट'

सेरेना विल्यम्सकडून 'बेबीगर्ल्स'चा पहिला फोटो 'पोस्ट'

टेनिसस्टार सेरेना विल्यम्सनं आपल्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. इन्सास्टाग्रामवर तीने हा फोटो पोस्ट केलाय. पहिल्या काही तासातच या फोटोला तब्बल साडे आठ लाखाहून जास्त लाईक्स तर 30 हजार कमेंट्स मिळालेत.

  • Share this:

13 सप्टेंबर : टेनिसस्टार सेरेना विल्यम्सनं आपल्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. इन्सास्टाग्रामवर तीने हा फोटो पोस्ट केलाय. पहिल्या काही तासातच या फोटोला तब्बल साडे आठ लाखाहून जास्त लाईक्स तर 30 हजार कमेंट्स मिळालेत. आई झाल्यानंतर दोन आठवड्यांनी सेरेना विल्यम्सनी आपल्या मुलीचा चेहरा जगासमोर आणलाय. सेरेनानं मुलीच नाव एलेक्सिस ओलम्पिया ओहानियन असं ठेवलंय. होणाऱ्या नवऱ्याच्या नावावर सेरेनानं आपल्या मुलीचं नाव ठेवलंय. 23 वेळा ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या सेरेनानं, जानेवारीमध्ये पुन्हा टेनिस कोर्टवर उतरण्याचा निर्धार केलाय. या फोटोसोबतच सेरेनाने आई बनण्याचा संपूर्ण व्हिडिओही अपलोड केलाय.

सेरेना विलियम्सने 23 ग्रँड स्लॅम पदकं जिंकलीत. एवढंच नाहीत अगदी प्रेगन्सी पिरियडमध्येही तिने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फक्त सहभागच नोंदवला नाहीतर ग्रँडस्लॅम पदकही जिंकून आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आई बनल्यानंतर ती येत्या जानेवारीतच ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत खेळणारही आहे. तिने स्वतःच टेनिस पुनरागमनाची घोषणा करून टाकलीय. एलेक्सिस ओलम्पिया ओहानियन याच्यासोबत तिचा साखरपुडा झाला असून तीने लग्नाआधीच आई बनण्याचा 'बोल्ड' निर्णय घेतला आणि तिने ते करूनही दाखवलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2017 04:56 PM IST

ताज्या बातम्या