मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'... यासाठी आधी माझी हिंमतच होत नसे', Bold Photoshoot नंतर समंथाचा खुलासा

'... यासाठी आधी माझी हिंमतच होत नसे', Bold Photoshoot नंतर समंथाचा खुलासा

समंथा रुथ प्रभूने अलीकडेच केलेल्या फोटोशूटदरम्यान (Samantha Ruth Prabhu Peacock Magazine) स्वतःमध्ये जाणवलेल्या बदलांबाबत समंथाने काही खुलासे केले आहेत.

समंथा रुथ प्रभूने अलीकडेच केलेल्या फोटोशूटदरम्यान (Samantha Ruth Prabhu Peacock Magazine) स्वतःमध्ये जाणवलेल्या बदलांबाबत समंथाने काही खुलासे केले आहेत.

समंथा रुथ प्रभूने अलीकडेच केलेल्या फोटोशूटदरम्यान (Samantha Ruth Prabhu Peacock Magazine) स्वतःमध्ये जाणवलेल्या बदलांबाबत समंथाने काही खुलासे केले आहेत.

    मुंबई, 09 मे: अभिनेता-अभिनेत्रींचं फोटोशूट हा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतो. अनेक अभिनेत्रींची बोल्ड फोटोशूट्स सोशल मीडियावर सेन्सेशन ठरतात. अर्थात, अशा फोटोशूटला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतल्या (South Film Industry) आघाडीच्या अभिनेत्रीदेखील अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) खासगी जीवनातल्या घडामोडींमुळे चर्चेत आहे. नागा चैतन्यशी घटस्फोट झाल्यानंतर सुपरस्टार समंथा विशेष चर्चेत आहे, केवळ वैयक्तिक आयुष्यामुळे नाही तर तिच्या प्रोफेशनल लाइफमुळे देखील.  'पुष्पा – द राईज' या ब्लॉकबस्टर चित्रपटातल्या 'ऊ अंटवा' या आयटम सॉंगमुळे समंथा यशाच्या शिखरावर पोहोचली.  त्याआधी तिचं 'द फॅमिली मॅन 2' मधील काम देखील प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं होतं. दरम्यान, समंथाने यानंतर काही बोल्ड फोटोशूट देखील केली आहेत. तिने अलीकडेच केलेल्या फोटोशूटदरम्यान (Samantha Ruth Prabhu Peacock Magazine) स्वतःमध्ये जाणवलेल्या बदलांबाबत समंथाने काही खुलासे केले आहेत.

    हे वाचा-Amjad Khan यांचे चित्रपट निर्मात्यांनी बुडवले सव्वा कोटी, मुलगा शादाबचा धक्कादायक खुलासा

    अभिनेता नागा चैतन्यशी (Samantha and Naga Chaitanya Divorce) घटस्फोट झाल्यानंतर समंथा सध्या करिअरवर फोकस करताना दिसते आहे. सध्या तिचे अनेक प्रोजेक्ट प्रगतीपथावर आहेत. त्यासोबत समंथा बोल्ड फोटोशूटच्या माध्यमातून फॅन्सच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. बोल्ड आणि बिंधास्त अशी तिची नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे. काही महिन्यांपूर्वी समंथा आणि नागा यांनी विभक्त होण्याचं जाहीर करताच चर्चांना उधाण आलं होतं. पण आता समंथानं याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देत करिअरवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

    हे वाचा-आयुषी भावेनं नवऱ्याला सोडून या अभिनेत्यासोबच धरला डान्सचा ठेका, Video होतोय Viral

    सध्या अभिनेत्री समंथाकडे अनेक दमदार प्रोजेक्ट्स आहेत. त्यात 'शाकुंतलम' आणि 'यशोदा' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यासोबतच समंथाचे फोटो एका प्रसिद्ध मॅगझिनच्या मे-जून 2022 च्या अंकाच्या कव्हरवर झळकणार आहेत. 'पिकॉक मॅगझीन'च्या कव्हर पेजसाठी समंथाने बोल्ड फोटोशूट केलं आहे. यावेळी मॅगझीनशी बोलताना समंथाने काळानुसार बदलेल्या तिच्या आत्मविश्वासाविषयी भाष्य केले आहे.

    'एक वेळ अशी होती की, मी माझ्या त्वचेमुळे खूपच अस्वस्थ असे', असं समंथानं म्हटलं आहे. 'माझ्यामध्ये त्वचेबाबत आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी मला थोडा वेळ लागला. मी वेगवेगळ्या भूमिका आत्मविश्वासाने निभावते, एखादं सेक्सी गाणं असो अथवा हार्डकोअर अ‍ॅक्शन. जे करण्यासाठी आधी माझी हिंमत होत नसे.'  असं समंथाने स्पष्ट केलं.

    समंथाने नुकताच कव्हर फोटोसाठी शूट केलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर करताना ती लिहिते, 'बऱ्याच प्रोजेक्टवर काम केल्यानंतर, मी आता कॉन्फिडंट आहे, असं म्हणू शकते. हा आत्मविश्वास वय आणि परिपक्वतेमुळं येतो, असा मला विश्वास आहे.' एकूणच या फोटोशूटमधल्या बोल्ड आणि बिनधास्तपणामुळे साउथ सुपरस्टार समंथा रुथ प्रभूला नवी ओळख मिळताना दिसत आहे.

    First published:
    top videos