'बीसीसीआयमध्ये वशिला नव्हता, म्हणून प्रशिक्षक बनलो नाही'

'बीसीसीआयमध्ये वशिला नव्हता, म्हणून प्रशिक्षक बनलो नाही'

''बीसीसीआयमध्ये माझा वशिला नव्हता, म्हणूनच कदाचित मी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकलो नाही, असा घणाघात माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने केला आहे. तसंच यापुढे मी प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार नसल्याचंही त्याने स्पष्ट केलंय. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सेहवागने हे सणसणाटी आरोप केलेत.

  • Share this:

नवी दिल्ली,15 सप्टेंबर : ''बीसीसीआयमध्ये माझा वशिला नव्हता, म्हणूनच कदाचित मी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकलो नाही, असा घणाघात माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने केला आहे. तसंच यापुढे मी प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार नसल्याचंही त्याने स्पष्ट केलंय. सेहवागच्या या आरोपांमुळे प्रशिक्षक पदाचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सेहवागने हे सणसणाटी आरोप केलेत. खरंतर मला या पदात अजिबात रस नव्हता. पण बीबीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांच्या सांगण्यावरून मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरण्यास राजी झालो. पण तिथंही राजकारण झाल्याने आपला पूर्ण भ्रमनिरास झाल्याचं सेहवागने म्हटलंय.

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज भरण्याअगोदर आपण विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्याही कानावर घातलं होतं. त्यावेळी रवी शास्त्री मला या पदात रस नसल्याचं म्हणाले. पण नंतर त्यांनी स्वतःच या पदासाठी अर्ज भरला, तेव्हा मीही अचंबित झालो. मला जर आधी हे माहित असतं तर मी अर्जही केला नसता. असंही सेहवागने या मुलाखतीत म्हटलंय. रवी शास्त्री हेच कोचच्या पोस्टसाठी विराट कोहलीचे आवडते होते, अशी पुष्टीही त्याने यावेळी जोडलीय.

सेहवागने मुख्य प्रशिक्षकपदासाठी केवळ दोन ओळींचा अर्ज केला होता. त्यात त्याने आपण आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा मेंबर असल्याचं लिहिलं होतं. गेल्या 10 जुलै रोजी त्याची रितसर मुलाखतही झाली होती. क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांच्या समितीने त्याची रितसर मुलाखतही घेतली. सेहवागचे प्रेझेन्टेशन सुमारे 2 तास चालले होते. तर रवी शास्त्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यात सामील झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2017 09:32 PM IST

ताज्या बातम्या