Asian Games 2018 : नीरज चोपडाने भालाफेकीत सुवर्ण जिंकून घडवला इतिहास

Asian Games 2018 : नीरज चोपडाने भालाफेकीत सुवर्ण जिंकून घडवला इतिहास

भालाफेकीत नीरज चोपडाने सुवर्णपदक जिंकत भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला

  • Share this:

इंडोनेशिया ,ता. 27 ऑगस्ट : आशियाई खेळाच्या आजच्या 9 व्या दिवशी भारतानं आणखी एक सुवर्णपदक खिशात घातलंय. भालाफेकीत नीरज चोपडाने सुवर्णपदक जिंकत भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला. भारताचं हे 8 वं सुर्वणपदक आहे. अतिशय दमदार खेळी करत नीरजनं आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि त्यात त्याला यशही मिळालं.  भारताने सुवर्णपदक मिळवून आघाडी घेतली असतानाच बॅडिमिंटनमध्ये मात्र भारताची कामगिरी निराशजनकच राहिली. सायना नेहवालला सेमिफायनलमध्ये चीनच्या ताईपे की ताइ ज्यु यिंग हिने एका मॅचने हरवलं.

सायनाने 21-17, 21-14 असा खेळ गमाला आणि भारताची पदकाची आशा मावळली. सायनाने कांस्य पदक जिंकत इतिहास निर्माण केला आहे. एशियन गेम्समध्ये मेडल जिंकणारी ती पहिलीच महिला बॅडमिंटनपटू बनली आहे. मात्र सुवर्णपदक जिंकून इतिहाश घडविण्याची तिची इच्छा अपूर्ण राहिली.

भारतानं आत्तापर्यंत 8 सुवर्णपदकासह एकून 37 पदकं आपल्या खात्यात जमा केले आहेत. भारताने आत्तापर्यंत 8 सुवर्ण, 10 रौप्य आणि 20 कांस्य पदकं जिंकली आहेत.

VIDEO : काय म्हणाली भारताची धावपटू हिमा दास?

First published: August 27, 2018, 7:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading