S M L

Asian Games 2018:मंजीत सिंह ने 800 मीटर शर्यतीत जिंकलं सुवर्ण

एशियन गेम्सच्या आजच्या दहाव्या दिवशीही भारतानं सुवर्ण पदक पटकावलं. धावपटू मंजीत सिंह ने 800 मीटर शर्यतीत आपलं सर्वोच्च प्रदर्शन करत सुवर्णपदक जिंकत नवा विक्रम केला.

Updated On: Aug 28, 2018 07:51 PM IST

Asian Games 2018:मंजीत सिंह ने 800 मीटर शर्यतीत जिंकलं सुवर्ण

जकार्ता (इंडोनेशिया)ता. 28 ऑगस्ट : एशियन गेम्सच्या आजच्या दहाव्या दिवशीही भारतानं सुवर्ण पदक पटकावलं. धावपटू मंजीत सिंह ने 800 मीटर शर्यतीत आपलं सर्वोच्च प्रदर्शन करत सुवर्णपदक जिंकत नवा विक्रम केला. तर जॉन्सनने रौप्य पजक जिंकलं. भारताच्या खात्यात आत्तापर्यंत 48 मेडल्स झाले आहेत. पी.व्ही.सिंधुने बॅडमिंटन सेमीफायनलमध्ये रौप्य पदक जिंकलं, मात्र फायनलमध्ये तीला यश मिळवता आलं नसलं तरी सिंधू एशियाडमध्ये सिव्हर जिंकणारी पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला इंडोनेशिया येथे होणाऱ्या आशियाई क्रिडा स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र सिंधूच्या या कामगिरीवर तिचे बाबा मात्र खूश आहेत. मुलीचं कौतुक करताना पी.व्ही. रामणा म्हणाले की,

‘सिंधूच्या आशियाई खेळातील कामगिरीवर मी खूश आहे. ती फक्त २३ वर्षांची आहे. तिच्या हातात अजून वय आहे. तिला अजून खूप काही साध्य करायचं आहे सिंधूने चीन तैपईच्या ताई झू यिंगकडून शिकत पुढे जायला हवं. तिच्या खेळातून चांगल्या गोष्टी शिकल्या तर त्याचा फायदा पुढच्या सामन्यांसाठी नक्की होईल.’

भारताची दुसरी स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अजूनही देशाचं नाव उंचवत आहे. या स्पर्धेत सानियाला कांस्य पदक मिळाले. सानिया २८ वर्षांची आहे. त्यामुळे सिंधूकडे खेळायला अजून सहज पाच वर्ष आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

तब्बल ३६ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर भारताला आशियाई खेळात बॅडमिंटनमध्ये पदक मिळालं. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला चीन तैपयीच्या नंबर १ खेळाडू ताई जू यंगने सरळ सेटमध्ये हरवले. ही संपूर्ण लढत एकतर्फी झाली. ताई जू यंग ही जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. पी.व्ही. सिंधू जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र आशियाई खेळाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची कामगिरी सिंधूने केल्यामुळे देशभरातून तिचे कौतुक केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2018 07:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close