Asian Games 2018 : समारोप समारंभात ध्वज घेण्याचा मान राणी रामपालला

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2018 07:48 PM IST

Asian Games 2018 : समारोप समारंभात ध्वज घेण्याचा मान राणी रामपालला

भारतीय महिला हॉकी संघाची कॅप्टन राणी रामपालला 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील समारोपात भारताकडून ध्वजवाहकाचा मान मिळाला आहे. राणीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम फेरीत  तब्बल 20 वर्षांनंतर कांस्यपदक पटकावलंय. त्यामुळे तीला हा मान मिळालाय.

भारतीय महिला हॉकी संघाने जपान विरुद्धचा अंतिम सामना जिंकला असता तर भारताला 36 वर्षांनंतर सुवर्णपदक मिळालं असतं. पण जपानने 2-1 ने भारतावर मात केल्याने यावर्षी कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

जागतिक पातळीवर अशी महान कामगीरी करणारी राणी ही सामान्य कुटुंबात वाढली आहे. तिचे वडील हरियाणामधील शाहबाद मारकंडा शहरात टांगा चालवतात तर दोन मोठे भाऊ दुकानात नोकरी करतात.

कुटुंबातील सगळ्या दुर्दैवी गोष्टींना मागे टाकून राणीने क्रीडा क्षेत्रात आपले करिअर करून कुटुंबाचं व देशाचं नाव मोठं केलं.

खेळण्यासोबतच तिच्यावर कुटुंबाची ही जबाबदारी होती. राणी केवळ १५ वर्षाची असताना 2010च्या विश्वचषक स्पर्धेतेत भारतीय हॉकी संघाकडून खेळली. तेव्हा ती संघात सर्वात कमी वयाची खेळाडू होती.

Loading...

विश्वचषकमधल्या चांगल्या प्रदर्शनामुळे तिला रेल्वेमध्ये क्लार्कची नोकरी मिळाली. त्यामुळे ती तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकली.

२०१३ मध्ये जूनियर हॉकी विश्वचषकात राणीला 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' हा पुरस्कार देण्यात आलाय त्याचबरोबर अर्जेंटीनामध्ये झालेल्या महिला हॉकी विश्वचषकात तिने ७ गोल केले होते त्यामुळे तिला सर्वश्रेष्ठ युवा खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2018 07:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...