मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'स्टुडंन्ट ऑफ ड इयर' नव्हे हा आहे आलिया भट्टचा पहिला चित्रपट, तुम्हाला माहितेय का?

'स्टुडंन्ट ऑफ ड इयर' नव्हे हा आहे आलिया भट्टचा पहिला चित्रपट, तुम्हाला माहितेय का?

आलियानं 'स्टुडंट ऑफ द इयर' (Student of The Year) या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये डेब्यु केला आहे, असा सर्वांचा समज आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनीही डेब्यु केला होता. मात्र, चित्रपटात अॅक्टिंग करण्याची ही आलियाची पहिलीच वेळ नव्हती.

आलियानं 'स्टुडंट ऑफ द इयर' (Student of The Year) या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये डेब्यु केला आहे, असा सर्वांचा समज आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनीही डेब्यु केला होता. मात्र, चित्रपटात अॅक्टिंग करण्याची ही आलियाची पहिलीच वेळ नव्हती.

आलियानं 'स्टुडंट ऑफ द इयर' (Student of The Year) या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये डेब्यु केला आहे, असा सर्वांचा समज आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनीही डेब्यु केला होता. मात्र, चित्रपटात अॅक्टिंग करण्याची ही आलियाची पहिलीच वेळ नव्हती.

पुढे वाचा ...

  मुंबई, 7 एप्रिल- अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. दोघांच्या कृतींमधून हे अनेकदा समोरही आलेलं आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून दोघांच्या लग्नाची (Ranbir Alia Marriage) चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत आहे तर दुसरीकडे त्यांचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटही लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. गंगूबाई काठियावाडी आणि आरआरआर (RRR) या दोन सुपरहिट चित्रपटांतील अॅक्टिंगमुळे आलियाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश झाला आहे. करिअरमध्ये यशाचं शिखर गाठल्यानंतर आता आलिया, कपूर कुटुंबाची सून होण्यासाठी सज्ज झाली आहे.

  मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट आणि रणबीर कपूर 17 एप्रिल 2022 रोजी मुंबईतील आर. के. स्टुडिओच्या परिसरातील विवाहस्थळी लग्नगाठ बांधणार आहेत. मात्र, याबाबत कपूर किंवा भट कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. कपूर कुटुंबात जन्मलेल्या रणबीरकडे अॅक्टिंगचा (Acting) प्रदीर्घ आणि समृद्ध वारसा आहे. याबाबत, आलियादेखील त्याच्या तोडीस तोड आहे. आलियानं वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी अॅक्टिंग डेब्यू (Acting Debut) केला होता.

  आलियानं 'स्टुडंट ऑफ द इयर' (Student of The Year) या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये डेब्यु केला आहे, असा सर्वांचा समज आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनीही डेब्यु केला होता. मात्र, चित्रपटात अॅक्टिंग करण्याची ही आलियाची पहिलीच वेळ नव्हती. आलियानं वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होतं, ही गोष्ट अनेकांना माहिती नाही. आलियानं प्रीती झिंटाच्या (Preity Zinta) 'संघर्ष' या चित्रपटात छोट्या प्रीतीची भूमिका केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाचं स्क्रिप्ट तिच्या वडिलांनी म्हणजे महेश भट यांनी लिहिलेलं होतं.

  15 मार्च 1993 रोजी चित्रपट निर्माते महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि अभिनेत्री सोनी राजदान (Soni Razdan) यांच्या घरी आलियाचा जन्म झाला. आलियाला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचं होते, त्यामुळे तिने अभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं नाही. महेश भट्ट यांचं आपल्या या मुलीवर खूप प्रेम आहे. यामुळेच त्यांनी तिच्या प्रत्येक निर्णयात तिला पाठिंबा दिला. आलियाची आई सोनी राजदान काश्मिरी असून वडील गुजराती आहेत. आलियाचं आणि तिची सख्खी बहीण शाहीन व सावत्र बहीण पूजा (Pooja Bhatt) यांचं चांगलं बाँडिंग आहे. याशिवाय आलियाला एक सावत्र भाऊदेखील आहे. त्याचं नाव राहुल आहे. सोनी राजदान यांच्याशी लग्न करण्यापूर्वी महेश भट यांनी लॉरेन ब्राइटशी पहिलं लग्न केलं होतं. लग्नानंतर लॉरेननं आपल नाव बदलून किरण भट ठेवलं होतं.

  आलियाने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत 14 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटात ती वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसली. बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर आलिया आता हॉलिवूडकडे वळली आहे. ती लवकरच वंडर वुमनफेम गॅल गॅडोटसोबत ( Gal Gadot) 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटामध्ये (Heart Of Stone) दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर ती या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमेरिकेला रवाना होणार आहे.समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया आणि रणबीरनं जर लग्न केलं तर त्यांच्या रुपात बॉलिवुडला आणखी एक पॉवर कपल मिळेल.

  First published:

  Tags: Alia Bhatt, Bollywood actress, Entertainment