मेरी कोमचा थेट प्रवेश वादात, क्रीडा मंत्रालयानं मागितलं उत्तर!

सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या मेरी कोम आणि लवलीना बोरगोहेन यांना प्रदर्शनाच्या जोरावर महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवडण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 02:16 PM IST

मेरी कोमचा थेट प्रवेश वादात, क्रीडा मंत्रालयानं मागितलं उत्तर!

मुंबई, 10 ऑगस्ट : भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमला वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी थेट प्रवेश दिल्यानं वाद सुरू झाला आहे. बॉक्सिंग फेडरेशनच्या निर्णयानंतर आता क्रीडा मंत्रालयानंही यावर प्रतिक्रिया देत बॉक्सिंग फेडरेशनकडून उत्तर मागितलं आहे.क्रीडा मंत्रालयानं नोटीस पाठवून या प्रकरणाची संपूर्ण माहिती मागितली आहे. कोणत्याही ट्रायलशिवाय खेळाडूची निवड कशी करण्यात आली यावर स्पष्टीकरण मागितलं आहे.

स्पोर्ट कोड 2011 नुसार भारत सरकारडून मदत घेणाऱ्या सर्व खेळातील संघांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेपूर्वी ट्रायल करणं बंधनकारक आहे. मात्र बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने या नियमाविरुद्ध वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी 51 किलोग्रॅम आणि 69 किलोग्रॅम वजनी गटात ट्रायल घेतली नाही.

भारताचा 23 वर्षीय बॉक्सर निकहतनं नुकतंच थायलंडमधील स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं होतं. ट्रायलमध्ये तिला मेरी कोमशी सामना होण्याची अपेक्षा होती. मात्र कोणतीही ट्रायल न घेता मेरी कोमला निवडण्यात आल्यानं निकहत नाराज झाली. यानंतर तिनं भारतीय बॉक्सिंग फेडरेशनला पत्र लिहून तक्रार केली.

मुख्य निवडकर्ता राजे भांडारींनी म्हटले की, मेरी कोमची निवड ही बीएफआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा होण्याआधी झाली होती. वर्ल्ड चॅम्पियनशिप रशियामध्ये तीन ते 13 ऑक्टोंबरमध्ये होणार आहे. भंडारी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, आम्हाला मेरी कोमच्या प्रशिक्षकांकडून प्रस्ताव मिळाला. त्यानंतर मेरी कोमच्या कामगिरीवरून तिची निवड ट्रायल न घेताच करण्यात आली. बीएफआयकडून या मुद्द्यावर सल्ला घेण्यात आला होता असंही स्पष्टीकरण भंडारी यांनी दिलं.

अलमट्टी धरणामुळे पुरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप किती खरा? पाहा ऑन द स्पॉट REPORT

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2019 02:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...