धाव घेताना अर्ध्यातच बसला फलंदाज तरीही गोलंदाजाने केलं नाही बाद; VIDEO VIRAL

धाव घेताना अर्ध्यातच बसला फलंदाज तरीही गोलंदाजाने केलं नाही बाद; VIDEO VIRAL

फलंदाज क्रीजवर अर्ध्यातच बसला होता आणि त्याला बाद करण्याची चांगली संधी होती पण गोलंदाजाने तसं केलं नाही. आता त्याच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले जात आहे.

  • Share this:

पर्ल, 13 डिसेंबर : क्रिकेट हा जंटलमन गेम म्हणून ओळखला जातो. कधी कधी असेही प्रसंग मैदानात घडतात की त्यामुळे या जंटलमन गेममध्ये वाद होतात. पण काही घटना खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवतात. यामुळेच या खेळाची लोकप्रियता टिकून आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या म्झांसी सुपर लीगमध्ये एका सामन्यावेळी अनोखा प्रकार बघायला मिळाला. लंकेचा गोलंदाज इसुरु उदाना याने हातात चेंडू असतानाही क्रीजमधून बाहेर असलेल्या फलंदाजाला बाद केलं नाही. हा प्रकार पर्ल रॉक्स आणि नेल्सन मंडेला बे जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यावेळी झाला.

म्झांसी सुपर लीगमधील सामन्यावेळी पर्ल रॉक्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 बाद 168 धावा केल्या. त्यांच्याकडून डेलपोर्टने 22 चेंडूत 9 चौकारांसह 39 धावा केल्या. तर वीरेन्नेने नाबाद 36 धावा फटकावल्या. यात इसुरु उदानाने 27 धावा केल्या. तर नेल्सन मंडेला बे जायंट्सकडून इमरान ताहीरने 2 गडी बाद केले.

नेल्सन मंडेलाकडून बेन डंकने 27 धावा काढून संघाला चांगली सुरुवात करून दिली. नवव्या षटकापर्यंत संघाच्या तीन बाद 62 धावा झाल्या होत्या. त्यानंतर कुहनने 43 चेंडूत 58 धावा केल्या. 19 व्या षटकात इसुरु उदाना गोलंदाजी करत असताना गुहन आणि मराइस क्रीजवर होते. संघाला 8 चेंडूत 24 धावांची गरज होती.

कुहनने उदानाच्या चेंडूवर जोरदार फटका मारला. पण चेंडू नॉन स्ट्रायकरला असलेल्या सहकारी मराइसला लागला. तेव्हा धाव घेताना चेंडू लागलेला मराईस क्रीजवर अर्ध्यातच बसला. त्यावेळी मराइसला बाद करण्याची संधी इसारु उदानाकडे होती. पण त्याने खिलाडूवृत्ती दाखवली आणि कुहनला बाद केलं नाही.

यानंतर 20 व्या षटकात मराइसने षटकार मारला. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात त्याचे प्रयत्न अपुरे पडले. पर्ल रॉक्सने 12 धावांनी हा सामना जिंकला. पर्ल रॉक्स गुणतक्त्यात अव्वल स्थानी असून त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. 16 डिसेंबरला अंतिम सामना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 07:22 AM IST

ताज्या बातम्या