VIDEO : याला म्हणतात जेंटलमॅन! मैदानात कोसळला फलंदाज, गोलंदाजाच्या हातात होता चेंडू पण...

VIDEO : याला म्हणतात जेंटलमॅन! मैदानात कोसळला फलंदाज, गोलंदाजाच्या हातात होता चेंडू पण...

क्रिकेट हा जेंटलमन गेम म्हणून आजही ओळखला जातो. मैदानावर असे काही प्रसंग घडतात जेव्हा खेळाडू प्रेक्षकांची मने जिंकतात.

  • Share this:

पर्ल, 11 डिसेंबर : क्रिकेट हा जेंटलमन गेम म्हणून आजही ओळखला जातो. मैदानावर असे काही प्रसंग घडतात जेव्हा खेळाडू प्रेक्षकांची मने जिंकतात. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणार्‍या मॅझन्सी सुपर लीगच्या सामन्यातही हेच पाहायला मिळालं. श्रीलंकेचा गोलंदाज ईसुरु उदाना यानं हातात चेंडू असूनही फलंदाजाला बाद केले नाही. पर्ल रॉक्स आणि नेल्सन मंडेला बे जायंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना उघडकीस आली.

डेलपोर्टने केल्या 39 धावा

मॅझन्सी सुपर लीगच्या या सामन्यात पर्ल रॉक्सने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 168 धावा केल्या. या सामन्यात संघासाठी डेलपोर्टने 22 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 39 धावा केल्या तर वीरेंनाने नाबाद 36 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेचा फलंदाज ईसुरु उदानानेही पर्ल रॉक्सच्या एकूण धावांमध्ये 21 चेंडूंत 27 धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने 1 षटकारही लगावला. सलामीवीर डेव्हिड्सने 31 धावा केल्या. नेल्सन मंडेला बे जायंट्सकडून इमरान ताहीरनं 2 विकेट घेतल्या.

म्हणूनच फलंदाज बाद झाला नाही

पर्ल रॉक्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना नेल्सन मंडेला बे जायंट्सने बेन डंकने 27 धावा करून संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र नवव्या ओव्हरमध्ये 62 धावांवर तीन विकेट गमावल्या. यानंतर कुहानने डाव सावरला आणि 43 चेंडूंत 58 धावा केल्या. त्याला रायन टेन ड्यूचे आणि मार्को मॅरेस यांनी चांगली साथ दिली. ईसुरु उदाना 19वी ओव्हर टाकत होता. यावेळी संघाला 8 चेंडूत 24 धावांची गरज होती. त्यावेळी उदानच्या बॉलवर कुहानने जोरदार शॉट खेळला, मात्र धाव काढण्याचा नादात मराईस मैदानावर कोसळला, त्यावेळी उदानाच्या हातात चेंडू असूनही त्यानं फलंदाजाला बाद केले नाही. यानंतर उदानाचे सर्वांनी कौतुक केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

16 डिसेंबरला होणार अंतिम सामना

या घटनेनंतर मॅरेसने डावाच्या 20व्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर षटकार ठोकला, परंतु हा सामना जिंकला आला नाही. पर्ल रॉक्सने हा सामना 12 धावांनी जिंकला. पर्ल रॉक्सने या विजयासह टेबलमध्ये प्रथम स्थान पटकावले आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. या लीगचा अंतिम सामना 16 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2019 02:15 PM IST

ताज्या बातम्या