स्पायडर वुमनचा VIRAL VIDEO : फक्त 7 सेकंदात सपासप भिंत चढली हिजाबवाली अॅथलिट

स्पायडर वुमनचा VIRAL VIDEO : फक्त 7 सेकंदात सपासप भिंत चढली हिजाबवाली अॅथलिट

क्षणभरात उभी भिंत झरझर चढणाऱ्या एका हिजाबवाल्या तरुणीचा VIDEO सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. World cup स्पर्धेत तिने अनोखा विक्रम नोंदवलाय.

  • Share this:

बाली (इंडोनेशिया), 23 ऑक्टोबर : भिंतीला हात चिकटवून झरझर उभी भिंत चढणाऱ्या एका हिजाबवाल्या तरुणीचा VIDEO सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चीनच्या शियानमेनमध्ये झालेल्या एका जागतिक स्पर्धेत सुसांती राहायू या इंडोनेशियन तरुणीनं वॉल क्लायंबिग स्पर्धेच्या वर्ल्ड कप स्पर्धेत एक वेगळाच विक्रम नोंदवला. भिंत चढण्याच्या तिच्या वेगानं सगळ्यांनाच अचंबित केलं. व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.

IFSC क्लाइम्बिंग वर्ल्ड कप स्पर्धेत महिला गटात खेळताना वॉल क्लाइंबिंगच्या एका इव्हेंटमध्ये सुसांतीने एका झटक्यात फक्त 7 सेकंदात 15 मीटर उंच भिंत चढली.

तिच्या या झपाट्याने प्रेक्षक अचंबित झाले. या स्पर्धेत भाग घेताना तिने लाल जर्सी परिधान केली होती. त्याबरोबर हिजाबही घातला होता. इंडोनेशिया हा मुस्लीमबहुल देश आहे.

15 मीटरची भिंत चढण्यासाठी सुसांतीला फक्त 6.995 सेकंद एवढा वेळ लागला. तिचा हा व्हिडिओ स्पायडर वुमन म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यूजर्स तिच्या तंदुरुस्तीचं आणि वेगाचं कौतुक करत आहेत. IFSC क्लाइम्बिंग वर्ल्ड कप स्पर्धेत महिला गटात सुसान्तीने एक वेगळाच विक्रम नोंदवला आहे. पूर्ण बाह्यांचा टीशर्ट, वर जर्सी आणि त्यावर हिजाब असा वेश असूनही तिने झटपट भिंत चढली.

----------------------------------------

अन्य बातम्या

एका षटकात 17 चेंडू टाकणाऱ्या क्रिकेटपटूची निवृत्ती, धोनीने दिली होती संधी!

वयाच्या 46व्या वर्षी तोडल्या बोल्डनेसच्या सीमा,11वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट

रस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 02:55 PM IST

ताज्या बातम्या